कोरोनामुळे पोटनिवडणुका अशक्य; खडसे समर्थक आमदारांना तूर्तास राष्ट्रवादीत प्रवेश नाही: जयंत पाटील
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा त्याग केला आहे. त्यांच्या संपर्कात भाजपचे अनेक आमदार आहेत. मात्र, कोरोनामुळे पोटनिवडणुका घेणं शक्य नसल्याने खडसे समर्थक आमदारांना तूर्तास राष्ट्रवादीत प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा त्याग केला आहे. त्यांच्या संपर्कात भाजपचे अनेक आमदार आहेत. मात्र, कोरोनामुळे पोटनिवडणुका घेणं शक्य नसल्याने खडसे समर्थक आमदारांना तूर्तास राष्ट्रवादीत प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. (bjp mla not join ncp with eknath khadse tomorrow, says jayant patil)
जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन खडसेंच्या भाजपमधील राजकीय भूकंपाची घोषणा केली. एकनाथ खडसे यांनी आज सकाळी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांचे राष्ट्रवादीत आम्ही स्वागत करत आहोत. त्यांचा पक्षप्रवेश रात्रीच्या अंधारात नव्हे तर उजेडात होईल, असं जयंत पाटील म्हणाले.
गेले कित्येक दिवस भाजपचे नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती ती चर्चा आज संपुष्टात आली असून आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे पाटील यांनी जाहीर केले. आता फक्त त्यांनाच प्रवेश दिला जाणार असून त्यांचे समर्थक येण्यास इच्छूक आहेत त्यांनाही काही दिवसात प्रवेश दिला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केलं.
खडसे यांच्या सोबत भाजपचे अनेक पदाधिकारी आणि आमदार राष्ट्रवादीत येण्यास इच्छूक आहेत. पण सध्या कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे आमदारांना राष्ट्रवादीत यायचं असेल तर त्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यांनी राजीनामा दिला तर कोरोना संकटामुळे पोटनिवडणुका होणं शक्य नाही. दहा-बारा ठिकाणी पोटनिवडणुका घेणं शक्य नाही. त्यामुळे तूर्तास या आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत प्रवेश मिळणार नाही. कोरोनाचं संकट गेल्यावर ते पक्षात येतीलच, असं सूचक विधान पाटील यांनी केलं. (bjp mla not join ncp with eknath khadse tomorrow, says jayant patil)
एकनाथ खडसेंच्या घरी कार्यकर्त्यांची रेलचेल, राजकीय भूकंप करण्यासाठी फौज सज्जhttps://t.co/PRuFtqkEE7 #EknathKhadse #NCP #EknathKhadse
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2020
संबंधित बातम्या:
एकनाथ खडसेंचा प्रवेश अंधारात नव्हे तर उजेडात होईल, राष्ट्रवादीला बळ मिळेल : जयंत पाटील
खडसेंनी राजीनामा दिला, शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार; जयंत पाटलांची अधिकृत घोषणा
EXCLUSIVE | एकनाथ खडसेंचं ठरलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत प्रवेश!
(bjp mla not join ncp with eknath khadse tomorrow, says jayant patil)