मुंबई: भाजप आमदार आणि प्रवक्ते राम कदम यानी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे. संजय राऊत यांनी जळगावमध्ये बोलताना पाच वर्षे आम्ही फडणवीस सरकारमध्ये होतो. पण शिवसेनेला सत्तेत असूनही गुलामासारखी वागणूक मिळत होती, असा धक्कादायक दावा केल्यानं एकच खळबळ उडाली होती. आता भाजपनं संजय राऊत यांना 7 वर्षापर्यंत शिवसेना गप्प का होती, असा सवाल केला आहे. (BJP MLA Ram Kadam gave answer to Sanjay Raut statement over Devendra Fadnavis government)
भाजप आमदार राम कदम यांनी संजय राऊत यांना 7 वर्षांपर्यंत शिवसेना का होती. आलिशान बंगला ,आलिशान गाड्या, आलिशान मंत्रालयातील केबिन
हे सर्व तुम्हाला हवे होते. गुलामसारखी वागणूक तुम्हाला मिळत होती तर कोणी तुमचे तोडं शिवले होते, असा सवाल राम कदम यांनी विचारला आहे. त्यावेळी तुमचा स्वाभिमान कुठे होता, असा सवालही राम कदम यांनी केला.
राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधातना राज्य सरकार विरोधातील जनतेचा रोष दुसरीकडे वळवण्यासाठी,हे वक्तव्य करण्यात येत आहे, असं म्हटलं.
संजय राऊत काय म्हणाले?
संजय राऊत हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज ते जळगावात आले होते. यावेळी शिवसेनेच्या मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी हे धक्कादायक विधान केलं आहे. राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. पण गेल्या पाच वर्षात शिवसेना संपवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला. शिवसेना सत्तेत असतानाही गावोगावी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला गेला. पाच वर्षे सत्तेत होतो. पण सत्तेत असूनही गुलाम होतो. गुलामासारखी वागणूक मिळत होती, असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला.
जळगावातून खासदार निवडून आणणार
जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे बळ आहे. त्यामुळे आगामी महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभा एवढेच नव्हे तर लोकसभा निवडणूक आम्ही आमच्या बळावर जिंकू आणि यशस्वी होऊ. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचा आमदार झाला, महापौर झाला आता खासदार शिवसेनेचा व्हावा, अशी अपेक्षा शिवसैनिकांची आहे. आम्ही ती निश्चित पूर्ण करू, अस ते म्हणाले.
VIDEO: आदित्य ठाकरेंचा बर्थडेला डोंबिवलीकरांची चांदी; एका रुपयात 1 लीटर पेट्रोल https://t.co/0ODk45xPp5 #Petrol #AadityaThackeray #birthday #Dombivli
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 13, 2021
संबंधित बातम्या:
काँग्रेसच्या आघाडीत किती पक्ष उरलेयत हे आता तपासायला हवे, नवी मजबूत आघाडी उभारण्याची गरज: राऊत
(BJP MLA Ram Kadam gave answer to Sanjay Raut statement over Devendra Fadnavis government)