पवारसाहेब जाणते राजे, मुंबई पोलिसांची नाचक्की करणाऱ्या गृहमंत्र्यांना हटवा, भाजपकडून जोर

गृहमंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे. किंवा नैतिक जबाबदारी स्वीकारुन त्यांनी स्वतः राजीनामा दिला पाहिजे" अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली. (Prasad Lad Anil Deshmukh Sachin Vaze )

पवारसाहेब जाणते राजे, मुंबई पोलिसांची नाचक्की करणाऱ्या गृहमंत्र्यांना हटवा, भाजपकडून जोर
शरद पवार, सचिन वाझे, अनिल देशमुख
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 3:35 PM

मुंबई : “सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणातील जी मोठी नावं बाहेर येत आहेत, किंवा येतील, त्यातून मुंबई पोलिसांची होणारी नाचक्की खेदजनक आहे. अशा लोकांना पाठीशी घालणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारुन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी राजीनामा द्यावा. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) जाणते राजे आहेत, मुंबई पोलिसांची नाचक्की करणाऱ्या गृहमंत्र्यांना हटवावं” अशी मागणी भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केली आहे. याच वेळी राष्ट्रवादीच्या गोटातही हालचालींना वेग आलेला असल्यामुळे गृहमंत्रिपदाचे खांदेपालट होणार का, हा प्रश्न विचारला जात आहे. (BJP MLC Prasad Lad demands resignation of Home Minister Anil Deshmukh in Sachin Vaze Case to Sharad Pawar)

प्रसाद लाड काय म्हणाले?

“सचिन वाझे प्रकरणात रोज नवनवीन उलगडे होत आहेत. स्कॉर्पिओ किंवा इनोव्हा कार असो, किंवा आणखी पोलीस अधिकाऱ्यांची नावं असो. यामध्ये मुंबई पोलिसांची नाचक्की केली गेली, त्याला कारण कोण आहे. त्याला पाठीशी घालणारे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी मी वारंवार विधानपरिषदेत करत होतो” असं प्रसाद लाड म्हणाले.

“अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतल्याशिवाय या प्रकरणाचा छडा लागणार नाही. शरद पवार महाराष्ट्राचे जाणते राजे मानले जातात. त्यांच्या पक्षाचा गृहमंत्री गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला पाठीशी घालत असेल. तर ही खेदजनक गोष्ट आहे. गृहमंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे. किंवा नैतिक जबाबदारी स्वीकारुन त्यांनी स्वतः राजीनामा दिला पाहिजे” अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली.

सचिन वाझे प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न होताना दिसत आहे. गृहमंत्रिपद दिग्गज नेत्याकडे जाण्याची चिन्हं आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांची गृहमंत्रिपदाबाबत चर्चेसाठी दुपारी बैठक होत आहे.प्रसाद लाड म्हणाले. (BJP MLC Prasad Lad demands resignation of Home Minister Anil Deshmukh in Sachin Vaze Case to Sharad Pawar)

सचिन वाझेंचे निलंबन

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सचिन वाझे यांचे पोलीस दलातून निलंबन करण्यात आले आहे. यामुळे वाझेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सचिन वाझे हे सध्या राष्ट्रीय तपासयंत्रणेच्या (NIA) कोठडीत आहेत. त्यांना शनिवारी रात्री अटक करण्यात आली होती. यानंतर रविवारी विशेष न्यायालयात हजर करून NIA ने 25 मार्चपर्यंत त्यांचा रिमांड मिळवला.

संबंधित बातम्या :

सचिन वाझेंची प्रकृती पुन्हा खालावली; उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात हलवले

वाझे सट्टेवाल्यांकडून खंडणी उकळतो पण तो पुढे कुणाला देतो?; नितेश राणेंचा गंभीर आरोप

‘एनआयए’कडून सचिन वाझेंची झाडाझडती, ठाकरे सरकार सावध; वर्षा बंगल्यावर शरद पवार-मुख्यमंत्र्यांची भेट

(BJP MLC Prasad Lad demands resignation of Home Minister Anil Deshmukh in Sachin Vaze Case to Sharad Pawar)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.