AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pandharpur By-Election : भाजपला आणखी एक धक्का, बिनीचा शिलेदार जायबंदी, प्रमुख नेत्यालाच कोरोना

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला आहे. मात्र आता भाजपाच्या प्रमुख नेत्यालाच कोरोनाची बाधा झाली आहे.

Pandharpur By-Election : भाजपला आणखी एक धक्का, बिनीचा शिलेदार जायबंदी, प्रमुख नेत्यालाच कोरोना
Ranjitsinh Mohite Patil
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 11:55 AM

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला आहे. मात्र आता भाजपाच्या प्रमुख नेत्यालाच कोरोनाची बाधा झाली आहे. भाजप नेते आणि विधानपरिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil corona) यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे (BJP Samadhan Autade) यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात फिरत असताना रणजीतसिंह मोहिते पाटील यांना कोरोनाची लक्षणे आढळली होती. त्यांनंतर त्यांची चाचणी केली असता, रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. (BJP MLC Ranjitsinh Mohite Patil tested corona positive during Pandharpur bypoll prachar rally)

निवडणुकीच्या प्रमुख शिलेदारालाच विलगीकरणात जावे लागल्याने भाजपाला आणखी एक धक्का मानला जात आहे. दरम्यान संपर्कात आलेल्यांनी कोरोना तपासणी करून घेण्याचे आवाहन रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे.

आधी कल्याण काळेंचा धक्का

दरम्यान, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. अशावेळी भाजपला एक मोठा धक्का बसलाय. कारण कल्याणराव काळे भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरत आहेत. 8 एप्रिल म्हणजे गुरुवारी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं आता नक्की झालंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कल्याणराव काळे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे.

मोहिते पाटील पितापुत्र भाजपात

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवार आणि पक्षासोबत असलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुत्र रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीची साथ सोडली. रणजीतसिंह यांनी भाजपात प्रवेश केला, तेव्हा विजयसिंह मोहिते पाटीलही भाजपच्या मंचावर उपस्थित होते. भाजप देईल त्या उमेदवाराचं काम करणार असल्याचं विजयसिंहांनी लोकसभा निवडणुकीवेळी जाहीर केलं होतं. त्यामुळे लोकसभेपाठोपाठ विधानसभेलाही राष्ट्रवादीला माळशिरस तालुक्यात फटका बसला होता.

कोण आहेत रणजितसिंह मोहिते पाटील?

रणजितसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीचे माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र आहेत.

रणजितसिंह हे राज्यसभेचे माजी खासदार आहेत.

2009 ते 2012 या कालावधीत रणजितसिंह हे राज्यसभेत होते.

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री  विजयसिंह मोहिते पाटील यांचे ते सुपुत्र आहेत.

रणजितसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. शिवाय, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते अध्यक्षही होते.

सोलापूर विभागाचंही महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतही रणजितसिंहांनी प्रतिनिधित्त्व केले होते.

पंढरपूर पोटनिवडणूक

राष्ट्रवादीचे नेते भारत भालके(Bharat Bhalke) याच्या मृत्यूनंतर रिक्त असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. समाधान महादेव आवताडे यांना भाजपकडून या मतदारसंघासाठी उमेदवारी देण्यात आली आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीने भारतनाना भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भारत भालके विरुद्ध समाधान आवताडे यांच्यात लढत होत आहे.

संबंधित बातम्या : 

Pandharpur By-Election : मी राष्ट्रवादीत जातोय, अजितदादांच्या उपस्थितीत प्रवेश करतोय, भाजपच्या नेत्याची घोषणा

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत चुरस, भाजपचा अधिकृत उमेदवार जाहीर

भालकेंच्या जागी पोटनिवडणुकीत मुलगा की पत्नी? अजितदादा-जयंत पाटील पंढरपुरात फैसला करणार 

(BJP MLC Ranjitsinh Mohite Patil tested corona positive during Pandharpur bypoll prachar rally)

पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.
बलुचिस्तानकडून पाक आणि चीनला उघड धमकी, VIDEO शेअर करत वाढवलं टेन्शन
बलुचिस्तानकडून पाक आणि चीनला उघड धमकी, VIDEO शेअर करत वाढवलं टेन्शन.
पाकड्यांना पाडलं उघडं, भारतीय लष्करानं सांगितलं काय खरं काय खोटं
पाकड्यांना पाडलं उघडं, भारतीय लष्करानं सांगितलं काय खरं काय खोटं.
अमृतसरमध्ये पाकचं ड्रोन घरावर, काचा फुटल्या तर कुठ आग लागली, बघा VIDEO
अमृतसरमध्ये पाकचं ड्रोन घरावर, काचा फुटल्या तर कुठ आग लागली, बघा VIDEO.
पाकच पितळ उघडं, गेले हल्ला करायला अन् मिसाईल फुटलंच नाही; फुसका बार...
पाकच पितळ उघडं, गेले हल्ला करायला अन् मिसाईल फुटलंच नाही; फुसका बार....
राजस्थानात स्फोट, मध्यरात्री भारताच्या धमाक्यांनी पाक एअरबेस उद्ध्वस्त
राजस्थानात स्फोट, मध्यरात्री भारताच्या धमाक्यांनी पाक एअरबेस उद्ध्वस्त.
पाक सेनेसाठी तबाहीची सकाळ, भारताने 'हे' 4 एअरबेस उद्ध्वस्त करत हादरवल
पाक सेनेसाठी तबाहीची सकाळ, भारताने 'हे' 4 एअरबेस उद्ध्वस्त करत हादरवल.