Anil Bonde | ‘उप’ लावायचं राहूनच जातं, अनिल बोंडेंची कबुली, चंद्रकांत पाटलांनंतर आणखी एका भाजप नेत्याची खदखद बाहेर

देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं यावरून चंद्रकांत पाटील यांनी केलेलं एक वक्तव्यदेखील सध्या चांगलंच व्हायरल होतंय

Anil Bonde | 'उप' लावायचं राहूनच जातं, अनिल बोंडेंची कबुली, चंद्रकांत पाटलांनंतर आणखी एका भाजप नेत्याची खदखद बाहेर
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 1:39 PM

नवी दिल्लीः जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनात देवेंद्र फडणवीसांविषयी (Devendra Fadanvis) आदर आहे. आजही मी मेसेज करताना मुख्यमंत्री महोदय.. .असं मेसेज करून जातो. पण त्याला आता उप लागलेलं आहे, हे विसरतो. जनतेच्या मनातली भावना कुणीही काढू शकत नाहीत. आजही राज्यात देवेंद्र फडणवीसांचं एककलमी नेतृत्व आहे, असं वक्तव्य भाजप खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीसांना केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानंतर उपमुख्यमंत्री व्हावं लागलं, यामुळे भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाल्यानंतर आता 21 दिवस उलटत असतानाही भाजपच्या नेत्यांनी असं वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजप नेत्यांच्या मनातील खदखद अजूनही शमलेली नाही का, असा सवालही यानिमित्ताने विचारला जातोय. कालच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीदेखील यासंदर्भात वक्तव्य केलं.

अनिल बोंडे काय म्हणाले?

राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबाबत बोलताना अनिल बोंडे म्हणाले, ‘ जनतेच्या मनात कार्यकर्त्यांच्या मनात देवेंद्र फडणवीसांविषयी भावना आहे. मी ही मेसेज करताना करून जातो मुख्यमंत्री महोदय.. पण त्याला आता उप लागलेलं आहे. जनतेच्या मनातली भावना कोणी काढू शकत नाही. मात्र राज्यात एककलमी नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीसचं आहेत..असं अनिल बोंडे म्हणाले.

राऊतांनी तब्येतीची काळजी घ्यावी…

अनिल बोंडे यांनी यावेळी संजय राऊतांनाही खोचक सल्ला दिला. राऊतांनी भाजपवर टीका करताना तब्येतीची काळजी घ्यावी. संजय राऊत मोठे नेते आहेत ते कोणाचं ऐकतील असं वाटत नाही. त्यांना तब्येतीचा काळजी घेण्याचा सल्ला मी दिला.. त्यांना दुसरं काय देणार कारण ते कोणाचं ऐकणार. सध्या ते बेताल वक्तव्य करत आहेत. पण अशी वक्तव्य करून जनतेची दिशाभूल करता येते मात्र कोर्टाची आणि निवडणूक आयोगाची नाही. शिवसेना कोणाची हे निवडणूक आयोग ठरवेल, असं वक्तव्य अनिल बोंडे यांनी केलं.

चंद्रकांत पाटीलांनाही खंत?

देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं यावरून चंद्रकांत पाटील यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या चांगलंच व्हायरल होतंय. पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, गेल्या अडीच वर्षांतील कारभार पाहिल्यानंतर राज्यात सत्ता बदलण्याची गरज होती. आणि तसा बदल झाला. पण सत्तेत बदल होत असताना जनतेला योग्य मेसेज देईल, असा नेता पाहिजे होता. जो चांगल्या निर्णयांना स्थिरता देईल. असे असूनही आपण मनावर दगड ठेवून फडणवीस आणि कंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला… या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांसह भाजपच्या अनेक नेत्यांच्या मनात मुख्यमंत्रीपदावरून अजूनही खदखद कायम असल्याचे दिसून येते.

शरद पवार काय म्हणाले?

भाजप नेत्यांनी मनावर दगड ठेवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केल्याच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी बोलणं टाळलं. हा निर्णय भाजपच्या अंतर्गत नेत्यांचा निर्णय आहे. त्यांनी मनावर दगड ठेवला की डोक्यावर, छातीवर दगड ठेवला मला माहिती नाही.. असं शरद पवार म्हणाले.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...