‘उघड्याजवळ नागडा गेला; रात्रभर हिवाने कुडकुडत.. राहुल गांधी-ठाकरे एकत्र तिथे बर्बादी’ कुणी दिलाय इशारा?

महाराष्ट्राच्या राजकारणातील काही समीकरणं आता आणखी घट्ट होण्याची चिन्हं आहेत. कारण काँग्रेस नेते राहुल गांधी स्वत: शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी भेटीसाठी येणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. विरोधी पक्षाच्या गोटात सध्या प्रचंड हालचाली सुरु आहेत. पण असं असताना सत्ताधारी पक्षही शांत नाही हेच दिसत आहे.

'उघड्याजवळ नागडा गेला; रात्रभर हिवाने कुडकुडत.. राहुल गांधी-ठाकरे एकत्र तिथे बर्बादी' कुणी दिलाय इशारा?
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 4:34 PM

अमरावती : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार असल्याचं खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितलं आहे. काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल येत्या सोमवारी उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली. पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी संबंधित वृत्ताचं खंडन केलं आहे. राहुल गांधी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार ही केवळ अफवा असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या बातम्या चर्चेत आल्यानंतर आता लगेच भाजप पक्ष सतर्क झाला आहे. भाजपकडून या भेटीवर टीका करण्यास सुरुवात झालीय.

भाजप खासदार अनिल बोंडे यांनी खोचक शब्दांमध्ये ट्विट करत राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. “पप्पू, पप्पू के घर जाता है तो, पप्पू स्क्वेअर होता है”, असं खोचक ट्विट अनिल बोंडे यांनी केलं आहे. अनिल बोंडे यांनी या ट्विटनंतर ‘टीव्ही 9 मराठी’ला देखील प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

‘जो स्वातंत्र्यवीर सावरकरांना तुच्छ लेखतो, त्याच्यासाठी ठाकरे लाल गालीच्या अंथरतात’

“नाना पटोले म्हणतात उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींची भेट ही अफवा आहे. उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी वीर सावरकरांचा फोटो आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं सिंहासन आहे. राहुल गांधी येत आहे तर त्यांना कसं वाटेल?”, असा प्रश्न अनिल बोंडे यांनी उपस्थित केला.

हे सुद्धा वाचा

“जो स्वातंत्र्यवीर सावरकरांना तुच्छ लेखतो, त्यांचा अपमान करतो, त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे लाल गालीच्या अंथरत आहेत. ही भेट त्यांच्या जीवाला चांगली वाटेल पण बाळासाहेब ठाकरे यांना आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्वर्गामध्ये कसं वाटेल त्याची कल्पनाही करू शकत नाही”, असं अनिल बोंडे म्हणाले.

यावेळी अनिल बोंडे यांनी आपल्या ट्विटवरही प्रतिक्रिया दिली. “उघड्या जवळ नागडा गेला आणि रात्रभर हिवाने कुडकुडत मेला. दोन्ही अकर्तृत्ववान लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा बरबादीला सुरुवात होते. जेव्हा कर्तव्यशून्य लोक एकत्र येण्याचा प्रयत्न करतात तेव्हा सगळी बरबादी कशी वाटचाल करते अशा प्रकारचा तो स्केअर आहे”, अशी टीका अनिल बोंडे यांनी केली.

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.