Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खानावळ चालक ते भाजपचा खासदार, जाणून घ्या अशोक नेतेंचा राजकीय प्रवास

MP Ashok Nete | अशोक नेते हे एका सामान्य कुटुंबात जन्माला आले होते. आपल्या मोठ्या भावासोबत ते 32 वर्षांपूर्वी गडचिरोलीत स्थायिक झाले. याठिकाणी अशोक नेते आणि त्यांचे बंधू नामदेव नेते यांनी एक खानावळ सुरु केली होती.

खानावळ चालक ते भाजपचा खासदार, जाणून घ्या अशोक नेतेंचा राजकीय प्रवास
अशोक नेते, भाजप खासदार
Follow us
| Updated on: Sep 10, 2021 | 8:10 AM

मुंबई: पार्टी विथ डिफरन्स अशी ओळख असलेल्या भाजप पक्षावर एरवी विरोधक कितीही टीका करत असले या पक्षाने समाजाच्या तळागाळातील लोकांना नेतृत्त्व करण्याची संधी बऱ्याच प्रमाणात दिली ही बाब नाकारता येणार नाही. आजघडीला विधिमंडळ आणि संसदेत भाजपचे असे अनेक नेते आहेत की, ज्यांना राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नाही. हे नेते अगदी साध्या कुटुंबातून किंवा परिस्थितीमधून पुढे आले आहेत. अशाच नेत्यांचे प्रतिनिधित्व करणारे एक नाव म्हणजे गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशोक नेते. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळखण असणाऱ्या गडचिरोली-चिमूर मतदारसंघातून अशोक नेते 2014 आणि 2019 असा सलग दोन टर्ममध्ये विजय मिळवला आहे.

कोण आहेत अशोक नेते?

अशोक नेते यांचा जन्म 1 जुलै 1963 रोजी गडचिरोली जिल्ह्यात झाला. आदिवासी समाजाच्या प्रश्नांची जाण असलेले राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे. अशोक नेते यांचा खासदारकीपर्यंतचा प्रवास हा संघर्षमय राहिला आहे. दांडगा जनसंपर्क, मृदू स्वभाव आणि बोलण्यात गोडवा असल्यामुळे गडचिरोतीली स्थानिकांना ते आपलेसे वाटतात.

तरुणपणी खानावळ चालवली

अशोक नेते हे एका सामान्य कुटुंबात जन्माला आले होते. आपल्या मोठ्या भावासोबत ते 32 वर्षांपूर्वी गडचिरोलीत स्थायिक झाले. याठिकाणी अशोक नेते आणि त्यांचे बंधू नामदेव नेते यांनी एक खानावळ सुरु केली होती. या काळात समाजकार्य करता करता अशोक नेते भाजपच्या संपर्कात आले. नंतरचा काही काळ अशोक नेते यांनी मोटर ड्रायव्हिंग स्कूल सुरु केले. राजकारणात स्थिरस्थावर होईपर्यंत अशोक नेते या उद्योगात सक्रिय होते.

अशोक नेते यांचा राजकीय प्रवास

अशोक नेते यांनी भाजपमध्ये काम करायला सुरुवात केल्यानंतर 1991 साली ते भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष झाले. 1994 मध्ये त्यांच्याकडे गडचिरोली भाजपच्या अनुसूचित मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. आगामी काळात त्यांच्या यशाची कमान चढतीच राहिली. त्यामुळेच 1997 मध्ये अशोक नेते हे गडचिरोली भाजपचे उपाध्यक्ष झाले. अशोक नेते यांनी 1999 साली भाजपच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक लढवली. यामध्ये ते विजयी झाले. 2004 मध्येही अशोक नेते यांनी या विजयाची पुनरावृत्ती केली. 2009 मध्ये भाजपने त्यांना गडचिरोली लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातही उतरवले होते. मात्र, काँग्रेसच्या मारोतराव कोवासे यांच्याकडून ते पराभूत झाले.

मात्र, त्यानंतरही अशोक नेते पक्षासाठी काम करत राहिले. त्यामुळेच पक्षाने अशोक नेते यांना 2014 साली पुन्हा गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवले. हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. या निवडणुकीत काँग्रेसने मारोतराव कोवासे यांच्याऐवजी डॉ. नामदेव उसंडी यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत अशोक नेते यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला. 2015 मध्ये अशोक नेते यांची पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूच्या संसदीय समितीच्या सदस्यपदी निवड झाली. यानंतर भाजपकडून त्यांना आदिवासी आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अशोक नेते यांनी पुन्हा एकदा गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवून दाखवला.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.