AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मजूर, गुत्तेदार, जिल्हा परिषद सदस्य ते खासदार; कोण आहेत सुधाकर श्रृंगारे?

MP Sudhakar Shingare | सुधाकर श्रृंगारे यांचा जन्म 5 मे 1962 रोजी लातूरमध्ये झाला. बालपणी त्यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. पुढील शिक्षणासाठी सुधाकर श्रृंगारे हे उद्गीरला गेले. मात्र, बारावीला असताना त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकून मजुरी करायला सुरुवात केली.

मजूर, गुत्तेदार, जिल्हा परिषद सदस्य ते खासदार; कोण आहेत सुधाकर श्रृंगारे?
सुधाकर श्रृंगारे, भाजप खासदार
Follow us
| Updated on: Sep 01, 2021 | 8:34 AM

मुंबई: 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसला मोठा फटका बसला होता. अनेक मतदारसंघात वंचितच्या उमेदवाराने मतांमध्ये फूट पाडल्याने काँग्रेसच्या बड्या नेत्यांवर पराभवाची नामुष्की ओढावली होती. तर प्रतिस्पर्धी उमेदवाराला त्यामुळे मदत झाली होती. यापैकीच एक मतदारसंघ म्हणजे लातूर. लातूरमध्ये वंचित फॅक्टरमुळे भाजपच्या सुधाकर श्रृंगारे यांचा विजय सुकर झाला होता. एरवी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुधाकर श्रृंगारे हे नाव चर्चेत नसले तरी त्यांचा राजकीय प्रवास हा रंजक म्हणावा असाच आहे. (Political journey of Latur Loksabha BJP MP Sudhakar Shingare)

कोण आहेत सुधाकर श्रृंगारे?

सुधाकर श्रृंगारे यांचा जन्म 5 मे 1962 रोजी लातूरमध्ये झाला. बालपणी त्यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. पुढील शिक्षणासाठी सुधाकर श्रृंगारे हे उद्गीरला गेले. मात्र, बारावीला असताना त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकून मजुरी करायला सुरुवात केली.

पुणे आणि बंगळुरूत काही काळ सुधाकर श्रृंगारे यांनी मजुरी केली. या व्यवसायातील खाचाखोचा माहिती झाल्यानंतर सुधाकर श्रृंगारे यांनी गुत्तेदारीचा व्यवसाय सुरु केला. यामधूनच पुढे जाऊन त्यांनी स्वत: बांधकामा व्यावसायिक म्हणून काम करायला सुरुवात केली.

दानशूर व्यक्तिमत्व

गरिबीतून वर आल्यामुळे सुधाकर श्रृंगारे यांना गोरगरिबांविषयी आपुलकी आहे. त्यामुळेच सुधाकर श्रृंगारे यांनी बांधकाम व्यवसायिक म्हणून नाव कमावल्यानंतर अनेकांना मदत पुरवली. त्यांनी अनेकांना लग्न आणि वैद्यकीय खर्चासाठी मदत केली. तसेच अनेकांना गुत्तेदारीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन दिला. त्यामुळे सुधाकर श्रृंगारे आजही तळागाळातील जनतेशी जोडले गेलेले आहेत.

सुधाकर श्रृंगारे यांचा राजकीय प्रवास

बांधकाम व्यवसायात रमलेल्या सुधाकर श्रृंगारे यांचा राजकारणाशी काडीमात्र संबंध नव्हता. मात्र, 2017 साली अहमपूर-चाकुरचे आमदार विनायक पाटील यांनी सुधाकर श्रृंगारे यांना राजकारणात आणले. लातूर जिल्हा परिषदेच्या वडवळ नागनाथ गटातून भाजपची उमेदवारी देऊन जिल्हा परिषद सदस्य केले. यानंतर 2019 मध्ये सुधाकर श्रृंगारे यांना लातूर लोकसभा मतदारसंघातून खासदारकीच्या निवडणुकीला उभे राहण्याची संधी चालून आली. या निवडणुकीत त्यांच्या विजयाची सुरुवीपासूनच हवा होती. त्याप्रमाणे सुधाकर श्रृंगारे यांनी काँग्रेसच्या मच्छिंद्र कामत यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला.

(Political journey of Latur Loksabha BJP MP Sudhakar Shingare)

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक.
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य.
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं.
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?.
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड.
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र.
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?.
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?.
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण.