Navneet Rana | गरीबांच्या श्रमाचे पैसे आहेत, राऊतांनी करप्शन दाबण्याचा प्रयत्न करु नये, खासदार नवनीत राणा यांचा इशारा
आमदार रवी राणा यांनीही शिवसेनाला इशारा देताना म्हटलं, ' पैशांच्या गैर व्यवहारात दोषी आढळल्यास उद्धव ठाकरेंवरही कारवाई व्हायला हवी. काँग्रेस आणि एनसीपीसोबत संजय राऊतांनी डील केलं. म्हणून उद्धव ठाकरे काँग्रेससोबत बसलेत.
मुंबईः गरीबांच्या घामाचे पैसे कुणी लुबाडत असेल तर त्याच्यावर कारवाई होणारच. मग ते देशातल्या कोणत्याही पक्षाचे नेते असो. राऊतांनी भ्रष्टाचार दाबण्याचा प्रयत्न करु नये, असा इशारा खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी दिला. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात ईडीने (ED) रविवारी कारवाई केली. रविवारी संध्याकाळी ईडीने त्यांना ताब्यात घेतले. राऊतांची अधिक चौकशी करण्यासाठी त्यांना ताब्यात घेण्यात आलं. तसेच भ्रष्टाचार करणाऱ्यांविरोधात आणखी तपास होणार आणि या तपासाच्या लिंक मातोश्रीपर्यंत जातील. गैरकारभार आढळल्यास मातोश्रीवरही कारवाई केली जाईल, असं वक्तव्य नवनीत राणा यांचे पती आणि आमदार रवी राणा यांनी केलं. सोमवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
नवनीत राणा काय म्हणाल्या?
संजय राऊतांवरील कारवाईवर प्रतिक्रिया देताना नवनीत राणा म्हणाल्या,’ संजय राऊतांविरोधात तपास सुरु आहे. ईडी प्रत्येक गोष्टीची विचारपूस करत आहे. त्यानंतरच त्यांच्यावर कारवाई करत होत आहे. हनुमान चालिसा म्हटल्यानंतर आम्हाला जेलमध्ये टाकलं. राज्यसभेत आज खासदार राऊतांना अटक झाल्यावरून टीका झाली. मग मी पण खासदार आहे. माझ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता, तेव्हा कुठे होते हे खासदार? ईडी योग्य काम करत आहे. सुप्रीम कोर्टानेही ईडीच्या बाजूने निकाल दिला आहे. ती एक स्वायत्त संस्था आहे. महाराष्ट्राच्या गरीबांचे पैसे एखादी व्यक्ती मिसयूझ करत असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. आज साध्या लोकांना दोन मुलांना चांगल्या शाळेत शिकवणं कठीण आहे. पण एका पत्रकाराकडे एवढी संपत्ती कुठून आली? त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही. महाराष्ट्राची जनता लढेगी… असं ते म्हणतायत… पण आम्ही अन्यायाविरोधात लढणारे लोक आहेत. राऊतांनी करप्शन दाबण्याचा प्रयत्न करू नये. कोणत्याही पक्षाचे लोक असो, ईडी कारवाई करणारच. तुमच्या घरात २१ कोटी रुपये सापडत असेल तर यावर कारवाई झालीच पाहिजे. उत्तराखंडातल्या आमदारांच्या गाडीत पैसे सापडले, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.
रवी राणांचा इशारा काय?
आमदार रवी राणा यांनीही शिवसेनाला इशारा देताना म्हटलं, ‘ पैशांच्या गैर व्यवहारात दोषी आढळल्यास उद्धव ठाकरेंवरही कारवाई व्हायला हवी. काँग्रेस आणि एनसीपीसोबत संजय राऊतांनी डील केलं. म्हणून उद्धव ठाकरे काँग्रेससोबत बसलेत. या प्रकरणाचा तपास केला तर ही लिंक मातोश्रीपर्यंत लागेल. ईडी ही एक सक्षम यंत्रणा आहे. ज्या राज्यात ज्या सरकारने घोटाळे केले, तेथील लोकांवर कारवाई होते. राऊतांची सात आठ महिन्यापासून चौकशी सुरू होती. पुरावे समोर आले म्हणून ईडीनं अटक केली. अनिल परबची चौकशी सुरू आहे..