AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालघरमध्ये भाजप खासदार राजेंद्र गावितांना शिवसेनेची उमेदवारी?

पालघर: पालघर लोकसभा  मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. पालघरच्या जागेसाठी शिवसेनेने हट्ट धरला आहे.  शिवसेनेने श्रीनिवास वनगांसाठी ही जागा मागितली असताना, आता शिवसेनेकडून भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. येत्या 2 दिवसात राजेंद्र गावित शिवसेनेत प्रवेश करुन, सेनेच्या तिकीटावर पालघर लोकसभा लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापणार […]

पालघरमध्ये भाजप खासदार राजेंद्र गावितांना शिवसेनेची उमेदवारी?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

पालघर: पालघर लोकसभा  मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. पालघरच्या जागेसाठी शिवसेनेने हट्ट धरला आहे.  शिवसेनेने श्रीनिवास वनगांसाठी ही जागा मागितली असताना, आता शिवसेनेकडून भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. येत्या 2 दिवसात राजेंद्र गावित शिवसेनेत प्रवेश करुन, सेनेच्या तिकीटावर पालघर लोकसभा लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापणार हे जवळपास निश्चित आहे.

भाजप खासदार चिंतामन वनगा यांच्या निधनामुळे काही महिन्यापूर्वीच पालघमध्ये पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत त्यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली. त्यावेळी भाजपने काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत राजेंद्र गावित यांचा विजय झाला.

आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपसोबत युती करताना, पालघरच्या जागेचा हट्ट धरला होता. मात्र आता श्रीनिवास वनगा यांच्याऐवजी शिवसेना राजेंद्र गावित यांनाच तिकीट देऊन, ही जागा स्वत:कडे ठेवणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

श्रीनिवास वनगांची घरवापसी?

काही दिवसांपूर्वी श्रीनिवास वनगा यांना भाजपमध्ये परत आणण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला होता. युतीतील कार्यकर्त्यांमधील नाराजी पाहता आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन न झाल्यास, याचा फटका युतीला बसू शकतो. भाजपचे दिवंगत खासदार वनगा यांच्या पुत्राची पुन्हा घरवापसी करण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवर होतोय की काय असा कयास राजकीय तज्ज्ञांनी बांधला आहे. शिवसेनेत गेलेले श्रीनिवास वनगा यांची भाजपमध्ये घरवापसी झाली, तर युतीमध्ये राजकीय भूकंप होऊ शकतो. उमेदवार श्रीनिवास वनगा यांनाच ठेवून कमळ चिन्हावर निवडणूक झाल्यास कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर होऊ शकते. मात्र वनगा यांच्या मृत्यूनंतर भाजप जिल्हाध्यक्षपासून पदाधिकाऱ्यांनी दिलेली वागणूक वनगा कुटुंब विसरतील का हाही मोठा प्रश्न आहे. वनगा कुटुंबाची घरवापसी अशक्यच असल्याचं चित्र आहे. येत्या दोन दिवसात पालघर लोकसभेसाठी युतीचा उमेदवार कोण असेल हे ठरणार असलं तरी शिवसेनाही एकेक पाऊल रणनीती आखून उचलत आहे.

राजेंद्र गावितांची भूमिका काय?

लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपने ऐनवेळी काँग्रेसचे राजमंत्री राहिलेले राजेंद्र गावित यांना उमेदवारी देऊन निवडून आणलं होतं. परंतु युतीच्या जागावाटपात पालघरची जागा शिवसेनेला सोडल्याने खासदार राजेंद्र गावित पुढे काय पाऊल उचलतात हे पाहणं औत्सुकतेचे असणार आहे. राजेंद्र गावितांना बहुजन विकास आघाडीकडूनही ऑफर असल्याचं सांगण्यात येत असलं तरी गावित बहुजन विकासमध्ये सामील होतील का हे काही दिवसानंतरच कळू शकेल. दुसरीकडे शिवसेनाही वनगा कुटुंबतीलच अन्य व्यक्तीला उमेदवारी देण्याची चाचपणी करतेय का हे उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच समोर येऊ शकेल.

संबंधित बातम्या 

पालघरमध्ये श्रीनिवास वनगांना भाजपच्या तिकिटावर लढवण्याच्या हालचाली?   

युती, आघाडी आणि बहुजन वंचित आघाडी, कोणत्या मतदारसंघात कुणाला उमेदवारी? 

भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही.
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल.
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं.
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात.
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं.
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल.
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा.
युद्धाच्या मोहिमेवर दुश्मनांना..; मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
युद्धाच्या मोहिमेवर दुश्मनांना..; मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा.
दुश्मनांना मातीत गाडणंही भारताला जमत, मोदींनी सैन्याला दिली त्रिसूत्री
दुश्मनांना मातीत गाडणंही भारताला जमत, मोदींनी सैन्याला दिली त्रिसूत्री.
नव्या पिढीसाठी तुम्ही नवी प्रेरणा आहात; मोदींकडून जवानांचं कौतुक
नव्या पिढीसाठी तुम्ही नवी प्रेरणा आहात; मोदींकडून जवानांचं कौतुक.