Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, त्यांनी टीका न करता प्रोत्साहन द्यायला हवे, रक्षा खडसेंचा खोचक टोला

कुठे लग्न दिसले की आपला वाजा घेऊन त्या ठिकाणी वाजविण्यास त्या हजर होतात, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली.((BJP MP Raksha Khadse criticizes Water Supply Minister gulabrao patil)

गुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, त्यांनी टीका न करता प्रोत्साहन द्यायला हवे, रक्षा खडसेंचा खोचक टोला
Raksha Khadse gulabrao patil
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 8:16 AM

जळगाव : केळी पीक योजनेच्या नुकसान भरपाईचे निकष बदल करण्याचे श्रेय मी घेत नाही. मात्र मंत्री गुलाबराव पाटील हे मला वडिलांसारखे आहेत. त्यामुळे याप्रकरणी त्यांनी माझ्यावर टीका न करता मुलीने चांगले काम केले म्हणून प्रोत्साहन द्यायला हवे,  असा खोचक टोला भाजप खासदार रक्षा खडसे यांना लगावला. (BJP MP Raksha Khadse criticizes Water Supply Minister gulabrao patil on Changes in banana crop insurance criteria)

केळी पीक विम्याचे निकषात बदल

केळी पीक विम्याचे निकष बदलल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. यावरून केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि राज्यातील सत्ताधारी महाविकासआघाडी यांच्यात श्रेय घेण्यावरुन वाद सुरु झाला आहे. याच वादातून राज्याचे पाणी पुरवठा योजना मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्यात चांगलाच कलगीतुरा पाहायला मिळाला.

रक्षा खडसे लग्न दिसले की वाजा घेऊन हजर होतात

हवामानावर आधारित फळपीक विम्याचे निकष राज्य शासनाने बदलले. पण भाजप खासदार रक्षा खडसे या केंद्राने निकष बदलल्याचा खोटा दावा करीत आहेत. कुठे लग्न दिसले की आपला वाजा घेऊन त्या ठिकाणी वाजविण्यास त्या हजर होतात, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली. या टीकेला रक्षा खडसे यांनीही शेलक्या शब्दात प्रत्युत्तर दिले.

मी कोणतेही श्रेय घेतले नाही

“मी गेल्या अनेक दिवसांपासून मुलांसोबत बाहेरगावी होते. याबाबत मी कोणतेही श्रेय घेतले नाही. माझे कुठेही वक्तव्य नाही. यामध्ये कोणाचेही श्रेय नाही. आम्ही फक्त शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला. त्यामुळे राज्य सरकारला निकष बदलावे लागेल,” असे रक्षा खडसेंनी सांगितले.

गुलाबराव पाटलांनी प्रोत्साहन देण्याची गरज

“मात्र यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माझ्यावर टीका करावी याचे मला आश्चर्य वाटत आहे. ते मला वडिलांसारखे आहेत. उलट मुलगी म्हणून त्यांनी या मुद्द्यावर चांगले काम केल्याने माझे कौतुक करुन प्रोत्साहन देण्याची गरज होती,” असे रक्षा खडसे म्हणाल्या.

(BJP MP Raksha Khadse criticizes Water Supply Minister gulabrao patil on Changes in banana crop insurance criteria)

संबंधित बातम्या :

‘नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली’, नाना पटोलेंचा पुन्हा मोदींवर हल्लाबोल

‘भाजपने ओबीसी समाजाचा विचार केला नसता तर विधानसभेला संधी मिळाली नसती’ रोहिणी खडसेंच्या टीकेला रक्षा खडसेंचं उत्तर

मराठा समाजाला 3 हजार कोटींचे, तर बारा बलुतेदारांना 7 हजार कोटींचे पॅकेज द्या, भाजपची मागणी

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.