Pragya Thakur | खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भर कार्यक्रमात भोवळ
खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना चक्कर येऊन त्या कोसळल्या. त्यामुळे कार्यक्रमस्थळी एकच धावपळ उडाली. (Sadhvi Pragya Thakur falls ill)
भोपाळ : भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांची एका कार्यक्रमादरम्यान प्रकृती बिघडली. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भोपाळमधील भाजपा कार्यालयात कार्यक्रम आयोजिक करण्यात आला होता. या कार्यक्रमाला हजर असलेल्या खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना चक्कर येऊन त्या कोसळल्या. त्यामुळे कार्यक्रमस्थळी एकच धावपळ उडाली. (Sadhvi Pragya Thakur falls ill)
चक्कर येऊन कोसळल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना प्राथमिक उपचारानंतर तातडीने घराकडे रवाना करण्यात आलं. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचं भाषण सुरु होतं. त्यावेळी प्रज्ञा ठाकूर यांना चक्कर आली आणि त्या कोसळल्या. (Sadhvi Pragya Thakur falls ill)
दरम्यान, काही दिवसांपूर्वी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. त्या उपचारानंतर नुकत्याच त्या भोपाळमध्ये आल्या होत्या. आज त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर, त्यांना अस्वस्थ वाटून भोवळ आली.
साध्वी प्रज्ञा ठाकूर या त्यांच्या अनेक वादग्रस्त विधानांमुळे परिचीत आहेत. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा जेलमध्ये होत्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचा पराभव केला.
आम्ही नाले किंवा शौचालये साफ करण्यासाठी खासदार झालेलो नाही हे सर्वांनी लक्षात ठेवा. ज्या कामांसाठी आम्ही खासदार झालो, ती कामं आम्ही प्रामाणिकपणे करु, असं साध्वी प्रज्ञा यांनी म्हटलं होतं.
मला खोट्या खटल्यात फसवलेल्या हेमंत करकरेंना दहशतवाद्यांनी मारुन माझं सुतक संपवलं, असं चीड आणणारं वक्तव्य साध्वी प्रज्ञा यांनी केलं होतं.
(Sadhvi Pragya Thakur falls ill)
संबंधित बातम्या
विरोधी पक्षांच्या मारक शक्तीमुळे भाजपने ज्येष्ठ नेते गमावले, प्रज्ञासिंह ठाकूर पुन्हा बरळल्या
VIDEO : नाले, गटारं आणि शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही : प्रज्ञा सिंह ठाकूर