Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पदवीधर निवडणुकीसाठी माझा फोटो वापरु नका; संभाजीराजेंचा उमेदवारांना इशारा

"पदवीधर निवडणुकीच्या प्रचारात उमेदवारांनी माझ्या संमतीशिवाय माझा फोटो वापर करु नये", असं आवाहन संभाजीराजे यांनी केलं आहे (BJP MP Sambhaji Raje appeal people to not use his photo for election).

पदवीधर निवडणुकीसाठी माझा फोटो वापरु नका; संभाजीराजेंचा उमेदवारांना इशारा
संभाजीराजे छत्रपती
Follow us
| Updated on: Nov 24, 2020 | 8:21 PM

मुंबई : राज्यात विधानपरिषदेच्या 3 पदवीधरच्या आणि 2 शिक्षक मतदारसंघासाठी येत्या 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. औरंगाबाद, पुणे, नागपूर विभागाच्या पदवीधर मतदारसंघाची तर अमरावती आणि पुणे विभागाच्या शिक्षक मतदारसंघांची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षाच्या नेत्यांकडून प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. मात्र, या प्रचारामध्ये काही उमेदवार भाजप खासदार संभाजीराजे यांच्या संमतीशिवाय त्यांच्या फोटोचा वापर करत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली आहे (BJP MP Sambhaji Raje appeal people to not use his photo for election).

उमेदवारांनी आपली संमती न घेता प्रचारात फोटो वापरल्याने संभाजीराजे यांनी ट्विटरवर याबाबत आक्षेप नोंदवला आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी संमतीशिवाय फोटोचा वापर करु नये, असं आवाहन संभाजीराजे म्हणाले आहेत (BJP MP Sambhaji Raje appeal people to not use his photo for election).

“विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघांची निवडणूक प्रक्रिया सुरु असून या निवडणूकीत काही उमेदवार माझ्या संमतीशिवाय माझ्या फोटोचा वापर करून प्रचार करीत आहेत. कोणत्याही उमेदवाराने माझ्या फोटोचा प्रचारासाठी वापर करू नये”, असं संभाजीराजे ट्विटरवर म्हणाले.

संभाजीराजे यांनी आपल्या ट्विटचा फोटो फेसबुकवरदेखील शेअर केला आहे. दरम्यान, संभाजीराजे यांच्या संमतीशिवाय कोणत्या उमेदवाराने प्रचारासाठी त्यांच्या फोटोचा वापर केला? असा प्रश्न अनेक कार्यकर्त्यांनी संभाजीराजेंना फेसबुकवर त्यांच्या पोस्टला कमेंट करत विचारला आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीचे मतदारसंघनिहाय उमेदवार

पुणे पदवीधर

अरुण लाड ( राष्ट्रवादी काँग्रेस ) संग्रामसिंह देशमुख भाजप प्रताप माने ( राष्ट्रवादी काँग्रेस बंडखोरी ) रुपाली पाटील ( मनसे ) शरद पाटील ( जनता दल ) सोमनाथ साळुंखे (वंचित बहुजन आघाडी ) श्रीमंत कोकाटे ( इतिहास संशोधक) डॉ.अमोल पवार ( आम आदमी पक्ष) अभिजित बिचुकले (अपक्ष)

औरंगाबाद पदवीधर

सतीश चव्हाण (राष्ट्रवादी ) शिरीष बोराळकर (भाजप) नागोरराव पांचाळ( वंचित)

रमेश पोकळे (भाजप बंडखोर)

नागपूर पदवीधर

अभिजीत वंजारी (कॉग्रेस ) संदीप जोशी( भाजप) नितीन रोंघे ( विदर्भवादी उमेदवार ) राहुल वानखेडे ( वंचित बहुजन आघाडी )

पुणे शिक्षक

जयंत आसनगावकर ( काँग्रेस) दत्तात्रय सावंत (अपक्ष) सम्राट शिंदे (वंचित) डॉ.सुभाष जाधव (एमफुक्टो)

अमरावती शिक्षक 

श्रीकांत देशपांडे (शिक्षक आघाडी ) मविआ पाठिंबा नितीन धांडे ( भाजप) दिलीप निंभोरकर (शिक्षक भारती) संगीता शिंदे (शिक्षण संघर्ष समिती) प्रकाश काळबांडे ( विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ)

संबंधित बातम्या : 

भाजपचा मुंबई महापालिका निवडणुकीत पराभव निश्चित, त्यामुळेच नेते कामाला लागले, जयंत पाटलांचा टोला

चंद्रशेखर बावनकुळेंवर नागपूर पदवीधर मतदारसंघाची जबाबदारी; भाजपकडून घोषणा

2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?.
फूल टाईम पोलीस, पार्ट टाईम चोर;पोलीस उपनिरीक्षकानेच बनवली चोरांची टोळी
फूल टाईम पोलीस, पार्ट टाईम चोर;पोलीस उपनिरीक्षकानेच बनवली चोरांची टोळी.
हातात हात अन् एवढ्या गर्दीत फक्त फडणवीस..शाहांच्या 'त्या' कृतीची चर्चा
हातात हात अन् एवढ्या गर्दीत फक्त फडणवीस..शाहांच्या 'त्या' कृतीची चर्चा.
संभाजीनगर पोलीस महानिरीक्षकांची मोठी कारवाई; निलंबित कासले बडतर्फ
संभाजीनगर पोलीस महानिरीक्षकांची मोठी कारवाई; निलंबित कासले बडतर्फ.
'माझ्या नातवाला शेतीची आवड आहे..', एकनाथ शिंदे नातवासोबत शेतात रमले
'माझ्या नातवाला शेतीची आवड आहे..', एकनाथ शिंदे नातवासोबत शेतात रमले.
दत्ता गाडेची गुगल हिस्ट्री चेक अन वारंवार पॉर्न...धक्कादायक माहिती उघड
दत्ता गाडेची गुगल हिस्ट्री चेक अन वारंवार पॉर्न...धक्कादायक माहिती उघड.
मराठी माणसांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून.., राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
मराठी माणसांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून.., राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
'हिंदी'विरोधात दादरमध्ये जागोजागी तुफान बॅनरबाजी, 'हिंदू आहोत पण...'
'हिंदी'विरोधात दादरमध्ये जागोजागी तुफान बॅनरबाजी, 'हिंदू आहोत पण...'.
अपघातग्रस्तांना 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार
अपघातग्रस्तांना 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार.
उद्या बोलाल गुजराती शिका, परवा बोलाल.. 'हिंदी'सक्तीचा मनसेकडून विरोध
उद्या बोलाल गुजराती शिका, परवा बोलाल.. 'हिंदी'सक्तीचा मनसेकडून विरोध.