आदित्य ठाकरे यांच्या ‘या’ एका चुकीमुळे वेदांता गुजरातला गेला; उन्मेश पाटलांनी वेदांतासाठी शिवसेनेला ठरवलं जबाबदार

भाजपा खासदार उन्मेश पाटील यांनी वेदांतावरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकारमुळेच वेदांता गुजरातला गेल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे यांच्या 'या' एका चुकीमुळे वेदांता गुजरातला गेला; उन्मेश पाटलांनी वेदांतासाठी शिवसेनेला ठरवलं जबाबदार
Follow us
| Updated on: Sep 16, 2022 | 7:51 AM

जळगाव : सध्या वेदांतावरून राजकारण चांगलेच तापले आहे. वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका सुरू आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी देखील विरोधकांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर देत आहेत. भाजपा (BJP) खासदार उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांनी वेदांतावरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) जोरदार निशाणा साधला आहे. विरोधी पक्षात आल्यानंतर तरुणांच्या भावना भडकावून त्यांच्यासाठी खूप काही करायचं आहे, असा कळवळा दाखवणं आदित्य ठाकरे यांनी बंद करावे. त्यापेक्षा सत्तेत असताना आदित्य ठाकरे यांनी सेमी कंडक्टर पॉलिसी जर वेळेत आणली असती तर सेमी कंडक्टर इंडस्ट्री असणाऱ्या वेदांताला आपल्या राज्यात आणखी मदत मिळाली असती असं पाटील यांनी म्हटलं आहे.

‘त्यांच्याकडे पेंग्विन आणण्यासाठी वेळ होता’

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, जेव्हा सत्तेत होते तेव्हा आदित्य ठाकरे यांच्याकडे पेंग्विन आणायला, परदेशात फिरायला घरी बसायला वेळ होता. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि ती ग्लोबल झाली पाहिजे ही आमची  भावना आहे. मात्र जुन्या सरकारला त्यासाठी वेळ नव्हता आदित्य ठाकरे कधी ग्रामीण भागाकडे फिरकले देखील नाहीत, असं उन्मेश पाटील यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

एमआयडीसी घोटाळ्याच्या चौकशीची मागणी

कायदे मंडळाच्या सदस्यांनी पॉलिसी तयार केली पाहिजे. पण यांना मलीदा खाण्यातून वेळ मिळाला नाही. आदित्य ठाकरेंनी कायदेमंडळाचे सदस्य असताना सभागृह चालवलं नाही. मग ते काय फक्त मलिदा खाण्यासाठी पर्यावरण मंत्री झाले होते का? असा देखील टोला खासदार उन्मेश पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. तसेच  एमआयडीसी जमीन घोटाळ्याची चौकशी करण्याची देखील आपण मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.