माजी मंत्री विश्वजीत कदमांसह काँग्रेस नेत्यांना भाजपाची खुली ऑफर; भाजप खासदाराने स्टेजवरच…

विश्वजीत कदम भाजपमध्ये जाणार का? या चर्चेला उधाण येणार आहे.

माजी मंत्री विश्वजीत कदमांसह काँग्रेस नेत्यांना भाजपाची खुली ऑफर; भाजप खासदाराने स्टेजवरच...
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Oct 16, 2022 | 11:36 PM

सांगली : काँग्रेसच्या कार्यक्रमात भाजपा खासदारांनी थेट काँग्रेसच्या माजी मंत्र्यांसह काँग्रेस नेत्यांना भाजपात येण्याची जाहीर ऑफर दिली. खासदार संजयकाका पाटील यांनी काँग्रेस आमदार विश्वजित कदमांसह उपस्थिती दिग्गज नेत्यांना भाजपा मध्ये येण्याचे जाहीर निमंत्रण दिले. यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. तर, खासदारांच्या या ऑफर मुळे पुन्हा एकदा विश्वजीत कदम भाजपमध्ये जाणार का? या चर्चेला उधाण येणार आहे.

सांगली शहरातल्या सिव्हील चौकाला स्वर्गीय पतंगराव कदम असे नामकरण करण्यात आले आहे. याचा उद्घाटन सोहळा कामगार मंत्री सुरेश खाडे, भाजपाचे खासदार संजयकाका पाटील, काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांच्यासह इतर काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.

सर्वपक्षीय आयोजित या कार्यक्रमांमध्ये भाजपा खासदार संजयकाका पाटील यांनी बोलताना व्यासपीठावर असणारे काँग्रेसचे माजी मंत्री व आमदार विश्वजीत कदम यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांना थेट भाजपामध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे.

देश कुठे चाललाय याचं भान ठेवून विश्वजीत कदम,आमदार विक्रम सावंत,विशाल पाटील, जयश्री पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांनी आपल्या सोबत येण्याचा विचार करावा, अशा शब्दात व्यासपीठावरून उपस्थित सर्व काँग्रेस नेते मंडळींना काँग्रेसच्या व्यासपीठावरून भाजपात येण्याची खुली ऑफर दिली आहे.

आता माझे हितशत्रू अधिक जागरुक होतील. पण, घाबरणार तो संजयकाका पाटील कसला. दोन हात करणे हा आपला स्वभाव आहे. त्यामुळे मी कशाची फिकीर करत नाही. अशा शब्दात भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी अप्रत्यक्ष इशारा देखील दिला आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.