Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तोपर्यंत महाविकासआघाडी सरकारला धोका नाही; राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

आता भाजप राज्यात पुन्हा 'ऑपरेशन लोटस' राबवणार असल्याची कुजबूज सुरु झाली आहे. | Mahavikas Aghadi BJP operation lotus

...तोपर्यंत महाविकासआघाडी सरकारला धोका नाही; राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा
Uddhav Thackeray and Devendra Fadnavis
Follow us
| Updated on: May 04, 2021 | 3:47 PM

मुंबई: राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस बरेच प्रयत्न करत आहेत. मात्र, शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे एकत्र असेपर्यंत महाविकासआघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) पडणार नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ (Hasna Mushrif) यांनी केला. (NCP Leader Hasan Mushrif says there will be no threat to Mahavikas Aghadi govt from BJP)

‘तुम्ही पंढरपूरमध्ये भाजपला साथ द्या…मी राज्यात यांचा करेक्ट कार्यक्रम करतो’, अशा आशयाचे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरातील प्रचारसभेत केले होते. त्यानंतर भाजपने महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांना धोबीपछाड देत पंढपूरची निवडणूक जिंकली. त्यामुळे आता भाजप राज्यात पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’ राबवणार असल्याची कुजबूज सुरु झाली आहे. चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर या दोघांनी यासंदर्भात थेट भाष्य करणे टाळले असले तरी देवेंद्र फडणवीस बोलत असतील तर त्यामध्ये तथ्य असेलच, असे सूचक वक्तव्य केले होते. त्यामुळे ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चेने जोर धरायला सुरुवात केली होती.

‘मी करेक्ट कार्यक्रम करतो, पण..’, पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

मात्र, हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना हे सर्व दावे फेटाळून लावले. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून भाजपकडून हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश येणार नाही. जोपर्यंत शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आहेत, तोपर्यंत सरकारला काही होणार नाही. महाविकास आघाडीचं हे सरकार पुढील 25 वर्ष चालेल, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले.

‘पंढरपूरात भगीरथ भालकेंच्या आईला उमेदवारी दिली असती तर…’

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीचा पराभव हा लोकांच्या नाराजीमुळे झालेला नाही. तर याठिकाणी रणनीती आखण्यात महाविकासआघाडी थोडीशी कमी पडली. भगीरथ भालके यांच्याऐवजी त्यांच्या आईला उमेदवारी दिली असती तर काम सोपं झालं असतं. मात्र, आम्ही हा निकाल स्वीकारला आहे, असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

Gokul Election Result Live | गोकुळ दूध निवडणुकीत विरोधी आघाडीतील पाचही उमेदवार आघाडीवर

‘चंद्रकांतदादा… दैदिप्यमान कामगिरीमुळेच तुम्हाला कोल्हापूर सोडून पुण्यातील मतदारसंघ निवडावा लागला’

“भारतनाना माफ करा, सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली”

(NCP Leader Hasan Mushrif says there will be no threat to Mahavikas Aghadi govt from BJP)

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.