जळगावात राष्ट्रवादीत इनकमिंग सुरु; खडसेंच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर खान्देशातील राजकारण ढवळून निघाले आहे (BJP Party workers Join NCP in Jalgaon).

जळगावात राष्ट्रवादीत इनकमिंग सुरु; खडसेंच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 4:51 PM

जळगाव : एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील अनेक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. रावेर तालुक्यातील 60 भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची इनकमिंग सुरु झाल्याचे बोलले जात आहे (BJP Party workers Join NCP in Jalgaon).

एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर खान्देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. भाजपमधील अनेक मोठे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या संपर्कात असल्याचा दावा खडसेंनी केला होता. आता त्याचाच प्रत्यय येत आहे. मुक्ताईनगरमध्ये आज 60 भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीला ओहोटी लागल्याची चर्चा रंगली होती. मात्र, वर्षभरात हे चित्र बदलताना दिसत आहे. आता एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर खान्देशात राष्ट्रवादी आणखी बळकट होताना दिसत आहे.

दरम्यान, भाजप नेते गिरीश महाजन यांना भाजप कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत प्रश्न विचारला असता कोणत्याही नगरसेवकाने, जिल्हा परिषद सदस्याने राजीनामा दिलेला नसल्याचं स्पष्ट केलं (BJP Party workers Join NCP in Jalgaon).

“राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांना काय मिळत हा खडसे आणि राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. एकनाथ खडसे यांनी आमचा पक्ष सोडला आहे आणि आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पक्ष सोडून कुणी जाणार नाही, जे हौशे गवशे आहेत तेच जातील”, असा टोला गिरीश महाजनांनी लगावला.

संबंधित बातमी : आता भाजपला ताकद दाखवतो, उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी; एकनाथ खडसेंची गर्जना

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.