पंकजाताईंनी अभ्यास केला, कराडांना उमेदवारी मिळवून दिली, मला जमलं नाही : राम शिंदे

विधानपरिषद निवडणुकीत बाहेरुन आलेल्यांना तिकीट दिल्याचा आरोप करत, भाजपचे दिग्गज नेते नाराज आहेत. (Ram Shinde on Pankaja Munde)

पंकजाताईंनी अभ्यास केला, कराडांना उमेदवारी मिळवून दिली, मला जमलं नाही : राम शिंदे
Follow us
| Updated on: May 14, 2020 | 3:17 PM

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत बाहेरुन आलेल्यांना तिकीट दिल्याचा आरोप करत, भाजपचे दिग्गज नेते नाराज आहेत. (Ram Shinde on Pankaja Munde) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंपासून सुरु झालेली ही नाराजांची मालिका आता पंकजा मुंडेंपासून (Pankaja Munde) ते माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांच्यापर्यंत पोहोचली आहे. राम शिंदे यांनीही सोशल मीडियावर आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. (Ram Shinde on Pankaja Munde)

राम शिंदे यांनी ट्विटरवरुन निशाणा साधून आपली भूमिका मांडली. राम शिंदे म्हणाले, “विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी नेते, इच्छुक उमेदवार समजून घेतील आणि शिकतील असं म्हटलं होतं. त्या अनुषंगाने पंकजाताई मुंडे यांनी दोन दिवसात चांगला अभ्यास (त्यामुळे रमेश कराड यांना उमेदवारी मिळाली) केला. जो अभ्यास मला आणि इतरांना जमला नाही”

राम शिंदे यांचं नेमकं म्हणणं काय?

राम शिंदे यांच्या मते, चंद्रकांतदादांनी स्वत:च स्वत: समजावून घेण्यास सांगितलं, त्यानंतर 11 मे रोजी पंकजा मुंडे यांनी ट्विट करुन स्वत: शिकत असल्याचं ट्विट केलं. मग भाजपने आपला उमेदवार बदलून, पंकजा मुंडेंचे समर्थक असलेले रमेश कराड यांना उमेदवारी दिली.  त्यावरुन चंद्रकांतदादांनी जो अभ्यास करायला सांगितला होता तो ताईंना जमला, मला जमला नाही, असं राम शिंदे यांचं म्हणणं आहे.

पंकजा मुंडेंच्या दबावाने राज्य भाजपने उमेदवार बदलून रमेश कराड यांना उमेदवारी दिली, तसा दबाव बनवणे आपल्याला जमलं नाही, असं राम शिंदे यांचं अप्रत्यक्ष म्हणणं आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

विधानपरिषद निवडणुकीत भाजपने खडसे, बावनकुळे, पंकजा मुंडे या शर्यतीतील नेत्यांना डावलून तिकीटवाटप केलं. त्यावरुन हे नेते नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील म्हणाले होते, “एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा ताई यांच्याबद्दल केंद्राने काही विचार केला असेल. हे सगळे इतके चांगले कार्यकर्ते आहेत हे तिघेही समजूतदार असतील, ते स्वतःच स्वतःला समजावून सांगतील”

पंकजा मुंडेंचं ट्विट

चंद्रकांत पाटलांच्या या प्रतिक्रियेनंतर पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर चित्र प्रकाशित करुन स्वतःच स्वतःला शिकवते आहे, शून्यापासून सुरु केलं, चित्र चांगलं जमेल थोडे दिवसात असं म्हटलं होतं.

संबंधित बातम्या 

खडसे, बावनकुळे आणि पंकजा मुंडे स्वतःच स्वतःला समजावून सांगतील : चंद्रकांत पाटील

भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....