ठाकरे सरकारच्या तीन विकेट निश्चित, पहिली विकेट आव्हाडांची पडणार : किरीट सोमय्या
ठाकरे सरकारचे येत्या काही दिवसात तीन विकेट पडणार, असा भाकित भाजप प्रवक्ते किरीट सोमय्या यांनी वर्तवलं आहे.
मुंबई : ठाकरे सरकारचे येत्या काही दिवसात तीन विकेट पडणार, असं भाकित भाजप प्रवक्ते किरीट सोमय्या (Kirit Somaiya On Thackeray Govt) यांनी वर्तवलं आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर जेलमध्ये जाणार आणि परिवहन मंत्री अनिल परब देखील म्हाडा जमीनप्रकरणी घरी बसणार, असंही ते म्हणाले (Kirit Somaiya On Thackeray Govt).
किरीट सोमय्या हे अनंत करमुसे मारहाण प्रकरणी आज ठाणे पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी आले होते. अजूनपर्यंत जितेंद्र आव्हाड यांना कधी जेलमध्ये टाकणार, असा सवाल यावेळी त्यांनी केला. त्यांना अटक का होत नाही, असेही त्यांनी विचारले. यावेळी आमदार निरंजन डावखरे, भाजप नगरसेवक मनोहर डुंबरे देखील उपस्थित होते.
टीआरपी प्रकरणात ठाकरे सरकार आणि अनिल देशमुख त्या चॅनेलवाल्यांना का घाबरत आहेत. एफआयआरमध्ये दुसरेच नाव आहे. तसेच, ठाकरे सरकार आल्यापासून गृहमंत्री अनिल देशमुख जेलमध्ये टाकण्याची का धडपड करत आहेत, असंही ते म्हणाले.
विरोधी पक्ष म्हणून आम्ही ‘कोव्हिड-19’मध्ये पूर्ण जबाबदारीने काम करत आहे. कोव्हिड-19 मध्ये किती जण मृत्युमुखी पडले आहे. त्यामुळे हे सरकार त्यांच्या पापाने पडणार असा खोचक टोला किरीट सोमय्या यांनी यावेळी लगावला आहे (Kirit Somaiya On Thackeray Govt).
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर एसआरए प्रकरणात खोटे बोलत आहे. तर, याबाबत आम्ही पुढे जनहित याचिका टाकणार आहे.
आज विजेचं बिल आव्वाच्या सव्वा आले आहे, ठाकरे सरकार उत्तर देऊ शकले नाही, मला विश्वास आहे आम्हाला न्याय मिळणार, असंही ते म्हणाले. शीतल दामा प्रकरणात अधिकारी आणि काँट्रॅटरवर कारवाई करा, अशी मागणीही त्यांनी केली.
Today visited, inspected Ashapura Chawl Asalpha area alongwith Family of Sheetal Dama. Got down & physically checked size of the Manhole/Gutter where Sheetal feared drawn. Yes a Person can get drawn in it. Residents expressed anger, demanded action against BMC. @BJP4Maharashtra pic.twitter.com/dJS1nzehmy
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 8, 2020
Kirit Somaiya On Thackeray Govt
संबंधित बातम्या :