कुणाचाही ‘बाप’ काढला नाही, ‘बाप’ हा सहज वापरला जाणारा शब्द; चंद्रकांत पाटलांची सारवासारव

चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीपासून ते शाळा सुरू होण्याच्या मुद्द्यापर्यंतच्या विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्यावरही खुलासा केला.

कुणाचाही 'बाप' काढला नाही, 'बाप' हा सहज वापरला जाणारा शब्द; चंद्रकांत पाटलांची सारवासारव
Follow us
| Updated on: Oct 15, 2020 | 12:11 PM

कोल्हापूर: बापाची पेंड हा सहजपणे वापरला जाणारा शब्द आहे. त्या शब्दाचा मी वापर केला. त्यातून कुणाचाही बाप काढायचा नव्हता. मी कुणाचाही बाप काढला नाही, अशी सारवासारव भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. (chandrakant patil reaction on his statements)

चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीपासून ते शाळा सुरू होण्याच्या मुद्द्यापर्यंतच्या विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्यावरही खुलासा केला. आपल्या मराठीत अनेक शब्द सहजपणे वापरले जातात. त्यापैकी बाप हा सुद्धा एक शब्द आहे. तुमच्या बापाची पेंड आहे का? असं आपण सहज म्हणतो. पुणे प्रभाग समितीच्या निवडणुकीच्या संदर्भानं आम्हीही बाप आहोत, असं मी म्हणालो. त्यातून कुणाचाही बाप काढायचा नव्हता. तसा माझा हेतूही नव्हता. अजित पवारांचाही बाप काढलेला नाही. हा सहज वापरलेला शब्द आहे. हे यांना कळत नाही का? त्यावरून अंगावर येण्याची गरजच काय?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.

काल राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनीही या शब्दावरून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत त्यांनी बोलू नये. देशातील 130 कोटी जनता आहे मोदींना बाप म्हणायला, असं सांगतानाच कोणाची बाप काढण्याची माझी संस्कृती नाही, असा टोलाही त्यांनी शिंदे यांना लगावला.

विद्यार्थ्यांची ओढताण का करताय?

यावेळी त्यांनी शाळा सुरू होण्याच्या मुद्द्यावरूनही सरकारवर टीका केली. शाळा सुरू होणार होणार असं हे सरकार सांगतं पण कधी सुरू होणार हे सांगत नाही. शालेय विद्यार्थ्यांची ओढताण तरी का करता? 1 जानेवारीपासून शाळा सुरू होणार हे एकदाच जाहीर तरी करा. म्हणजे मुलं टेन्शन मुक्त होतील. तबला, डान्स क्लास तरी लावतील, असं सांगतानाच शैक्षणिक वर्षे 1 जानेवारी ते डिसेंबर करा, अशी मागणीही त्यांनी केली.

सरकार तुमचं आहे, खुशाल ‘जलयुक्त’ची चौकशी करा

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी ‘कॅग’च्या अहवालातील सर्व आरोप फेटाळून लावले. जलयुक्त शिवार योजनेमुळे पाणीसाठा वाढला की नाही, हे राज्यातील शेतकऱ्यांनी अनुभवले आहे. या योजनेमुळे जमिनीखालील पाणीसाठी वाढला. त्यामुळे बोअरवेल आणि विहिरींमध्ये पाणी उपलब्ध झाले. परिणामी शेतकरी दोन-दोन पिकं घेऊ लागले होते, अनेक शेतकऱ्यांनी रब्बी पिके घेण्यासही सुरुवात केली. तर औरंगाबाद आणि जालना यासारख्या भागात लागणाऱ्या पाण्याच्या टँकर्सची संख्याही घटली होती. (chandrakant patil reaction on his statements)

मात्र, ‘कॅग’च्या अहवालात या सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला नाही. जलयुक्त शिवार योजनेतंर्गत संपूर्ण राज्यभरात एकूम 6,41,560 कामे झाली. परंतु, ‘कॅग’कडून यापैकी फक्त 1128 कामंच तपासण्यात आली. ही टक्केवारी अवघी 0.17 टक्के इतकी आहे. एकूण 22589 गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना पोहोचली असताना केवळ 120 गावांच्या पाहणीवरून योजनेचे मूल्यमापन कसे काय होऊ शकते, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

संबंधित बातम्या:

जलयुक्त शिवारातील जनसहभागाचीही चौकशी करणार का?; चंद्रकांत पाटील यांचा सवाल

जलयुक्त शिवारातील जनसहभागाचीही चौकशी करणार का?; चंद्रकांत पाटील यांचा सवाल

फडणवीसच म्हणाले होते जलयुक्त शिवारची चौकशी करा, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

(chandrakant patil reaction on his statements)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.