भाजप उमेदवारांविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार कोण?
मुंबई : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी 182 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची घोषणा होती. त्यानंतर भाजपने महाराष्ट्रातील तिसरी यादी जाहीर केली. तिसऱ्या यादीत 6 जणांची नावं आहेत. नागपुरातून नितीन गडकरी, नगरमधून सुजय विखे पाटील अशा महत्त्वाचे उमेदवार भाजपच्या पहिल्या यादीत होते. तर दुसऱ्या यादीत पुण्यातून गिरीश बापट, बारामतीतून कांंचन कूल […]
मुंबई : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी 182 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची घोषणा होती. त्यानंतर भाजपने महाराष्ट्रातील तिसरी यादी जाहीर केली. तिसऱ्या यादीत 6 जणांची नावं आहेत. नागपुरातून नितीन गडकरी, नगरमधून सुजय विखे पाटील अशा महत्त्वाचे उमेदवार भाजपच्या पहिल्या यादीत होते. तर दुसऱ्या यादीत पुण्यातून गिरीश बापट, बारामतीतून कांंचन कूल यांची नावं आहेत. भाजपच्या आधी काँग्रेस-राष्ट्रवादीने आपल्या प्रत्येकी दोन याद्या जाहीर केल्या. काँग्रेसने आज तिसरी यादी जाहीर केली आहे. त्यामुळे कुठल्या उमेदवारासमोर कोण उमेदवार असेल, याचं चित्र थोडंफार स्पष्ट झालं आहे.
कुठल्या उमेदवाराला कुणाची टक्कर?
- नागपूर – नितीन गडकरी (भाजप) विरुद्ध नाना पटोले (काँग्रेस)
- नंदुरबार – हिना गावित (भाजप) विरुद्ध के. सी. पडवी (काँग्रेस)
- धुळे – सुभाष भामरे (भाजप) विरुद्ध कुणाल पाटील (काँग्रेस)
- उत्तर मध्य मुंबई – पूनम महाजन (भाजप) विरुद्ध प्रिया दत्त (काँग्रेस)
- नगर – सुजय विखे (भाजप) विरुद्ध संग्राम जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस)
- बीड – डॉ. प्रीतम मुंडे (भाजप) विरुद्ध बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी काँग्रेस)
- वर्धा – रामदास तडस (भाजप) विरुद्ध चारुलता टोकस (काँग्रेस)
- चिमूर-गडचिरोली – अशोक नेते (भाजप) विरुद्ध नामदेव उसेंडी (काँग्रेस)
- रावेर – रक्षा खडसे (भाजप) विरुद्ध
- अकोला – संजय धोत्रे (भाजप) विरुद्ध
- जालना – रावसाहेब दानवे (भाजप) विरुद्ध विलास औताडे (काँग्रेस)
- भिवंडी – कपिल पाटील (भाजप) विरुद्ध सुरेश टावरे (काँग्रेस)
- उत्तर मुंबई – गोपाळ शेट्टी
- लातूर – सुधाकरराव श्रंगारे (भाजप) विरुद्ध मच्छिलिंद्र कामत (काँग्रेस)
- सांगली – संजयकाका पाटील (भाजप) विरुद्ध
- चंद्रपूर – हंसराज अहीर (भाजप) विरुद्ध विनायक बांगडे (काँग्रेस)
- पुणे – गिरीष बापट (भाजप) विरुद्ध
- बारामती – कांचन कुल (भाजप) विरुद्ध सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
- सोलापूर – जयसिद्धेश्वर स्वामी (भाजप) विरुद्ध सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस)
- जळगाव- स्मिता वाघ (भाजप) विरुद्ध गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)
- नांदेड – प्रताप पाटील चिखलीकर (भाजप) विरुद्ध
- दिंडोरी – डॉ भारती पवार (भाजप) विरुद्ध धनराज महाले (राष्ट्रवादी)
वाचा : Loksabha Election 2019 : भाजपची पहिली यादी जाहीर
लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. निवडणुकांसाठी आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. सर्वच पक्ष उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. भाजपने महाराष्ट्रातील दुसरी तर काँग्रेसने तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे.
संबंधित बातम्या :
काँग्रेसची उमेदवार यादी, औरंगाबादमध्ये सुभाष झांबड, चंद्रपुरात मुत्तेमवारांना धक्का
बारामतीत सुप्रिया सुळेंना टक्कर देणाऱ्या कांचन कुल कोण आहेत ?
भाजपची तिसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील सहा उमेदवारांची नावं घोषित
भाजपच्या पहिल्या यादीत दोन विद्यमान खासदारांना डच्चू
भाजपच्या पहिल्या यादीमुळे महाराष्ट्रातील दोन रोमहर्षक लढती निश्चित
पहिल्या यादीतून अडवाणींना डच्चू, गांधीनगरमधून ‘या’ बड्या नेत्याला संधी