‘बाहेर’च्या नेत्यांना मंत्रीपद दिल्यामुळे भाजपची मतं वाढण्याची शक्यता नाही?; पंकजा मुंडेंचं मिश्किल उत्तर

इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्यांनाच केंद्रात मंत्रिपद देण्यात आलं आहे. त्यामुळे भाजपचा जनाधार वाढणार की घटणार? याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. (pankaja munde)

'बाहेर'च्या नेत्यांना मंत्रीपद दिल्यामुळे भाजपची मतं वाढण्याची शक्यता नाही?; पंकजा मुंडेंचं मिश्किल उत्तर
pankaja munde
Follow us
| Updated on: Jul 09, 2021 | 2:33 PM

मुंबई: इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्यांनाच केंद्रात मंत्रिपद देण्यात आलं आहे. त्यामुळे भाजपचा जनाधार वाढणार की घटणार? याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. त्याबाबत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना आज प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अत्यंत मिश्किलपणे उत्तर दिलं आहे. मंत्रिपद मिळालेल्या लोकांमुळे भाजपचं एक मत जरी वाढत असेल तर त्याचंही स्वागत आहे, असं मिश्किल उत्तर पंकजा मुंडे यांनी दिलं. (bjp will get benefit from outsiders?, read what pankaja munde said)

पंकजा मुंडे यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. आम्ही कष्ट केले ते पक्षासाठी केले. माझ्याकडे येणारी गर्दी ही पक्षासाठीच आहे. त्यामुळे मी वेगळी आहे आणि पक्ष वेगळा असं मानत नाही. आणखी कोणी म्हणत असेल तर मला त्याबाबत काही म्हणायचं नाही, असं सांगतानाच पक्षात जे नवीन अॅडिशन झालं. त्याचं स्वागत आहे. ज्यांना मंत्रिपद मिळालं त्यांचंही स्वागत आहे. त्या मंत्रिपद मिळालेल्या लोकांमुळे भाजपचं एक मत जरी वाढत असेल तर त्याचंही स्वागत आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

तो नेत्याचा विजयच असतो

माझ्या वडिलांच्या निधनानंतर माझी बहिण राजकारणात आली. त्यावेळी त्या विक्रमी मताने विजयी झाल्या. ते स्वाभाविक होतं. मात्र, गेल्या निवडणुकीत त्या मेरिटवर निवडून आल्या. प्रचंड मतं त्यांना मिळाली. पण एखादा कार्यकर्ता मोठा होत असेल तर नेत्यासाठी ती अभिमानाची गोष्ट असते. एखाद्याची नेत्याप्रमाणे उंची वाढत असेल तर तो त्या नेत्याचा विजय आहे. त्यामुळे कुणाला काय मिळालं त्यावरून दु:ख वाटण्याचं कारण नाही, असं सांगतानाच काही नवी लोक जरूर आले आहेत. पण ते आलेत त्यावर पक्षाने विचारपूर्वक निर्णय घेतला असेल. त्यामुळे पक्षाची ताकद वाढणार असेल, पक्षात बदल होईल असं वाटतं, असं त्या म्हणाल्या.

पक्षाने अभ्यास केला असेल

ज्या लोकांना पद मिळाली आहेत, ते मुंडे साहेबांमुळेच पुढे गेले आहेत. ते मुंडेंच्या विचाराचे लोक आहेत. ते मुंडे परिवारापेक्षा मोठे व्हावेत हेच मुंडे साहेबांचे संस्कार आहेत. त्यामुळे ते आणि पक्ष वेगळा वाटत नाही. त्याचं दु:ख नाही. आम्हाला आनंदच आहे. विधानपरिषदेतही नव्या लोकांना घेतलं. त्यामुळे पक्षाची ताकद वाढली असेल. पक्षाने तसा अभ्यास केला असेल. नव्या लोकांना नवीन रोल मिळत असेल तर पक्ष त्याच्या फायद्या नुकसानाचं मोजमाप करेल, असं मिश्किल भाष्यही त्यांनी केलं.

आश्रित होण्याचा अर्ज करत नाहीये

आम्हाला मंत्रिपद मिळालं नाही. म्हणून नाराज होण्याचं कारण नाही. माझ्या घरात कोणताही पूर आला नाही. माझं घर वाहून गेलं नाही. मी कुठेही आश्रित होण्याचा अर्ज करत नाहीये. मग माझं पुनर्वसन कोणी कशाला करेल? असा सवाल करतानाच जे बरबाद झालेत. जे वाहून गेलेत. जे खत्म झाले आहेत. त्यांचं पुनर्वसन केलं जातं. पुनर्वसन शब्द मला मान्य नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. माझ्या मनात कोणतीही आपत्ती नाही. हा पक्षाचा निर्णय आहे. अशा निर्णयातून मी गेली आहे. मात्र, कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल असते. नाराजी असते. हे नाकारता येत नाही. पण माझ्या आणि कुटुंबाच्या मनात नाराजी नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (bjp will get benefit from outsiders?, read what pankaja munde said)

संबंधित बातम्या:

भागवत कराडांचा रात्री साडे बारा वाजता फोन आला होता, पंकजा मुंडेंनी नाराजी फेटाळली, आता म्हणाल्या सर्वांचं अभिनंदन

टीम देवेंद्र वगैरे असं आमच्याकडे नाही, मी-मी असं चालत नाही, पंकजा मुंडेंचा फडणवीसांना टोला

Video: आणि पंकजा मुंडेंचा कंठ दाटला, डोळे डबडबले, नाराजीवर उत्तर देता देता बाबांची आठवण

(bjp will get benefit from outsiders?, read what pankaja munde said)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.