राज ठाकरे अयोध्येला जाणार, फडणवीसही जाणार, दोघांची मुंबईसाठी युती होणार?

आता राज ठाकरे भाजपशी युती करण्यासाठी ही अट मान्य करणार का, हे आता पाहावे लागेल. | Chandrakant Patil

राज ठाकरे अयोध्येला जाणार, फडणवीसही जाणार, दोघांची मुंबईसाठी युती होणार?
राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजप आणि मनसे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याने आता राजकारणात नवा ट्विटस्ट आणला आहे.
Follow us
| Updated on: Jan 29, 2021 | 5:03 PM

सोलापूर: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) परप्रांतीयांबाबतची भूमिका बदलत नाहीत तोपर्यंत भाजप त्यांच्याशी युती करणार नाही, असे महत्त्वाचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजप आणि मनसे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याने आता राजकारणात नवा ट्विटस्ट आणला आहे. (BJP Chandrakant Patil on alliance with MNS)

ते शुक्रवारी सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी अट घालून एकप्रकारे मनसेशी युती करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता राज ठाकरे भाजपशी युती करण्यासाठी ही अट मान्य करणार का, हे आता पाहावे लागेल.

दरम्यान, या पत्रकारपरिषदेत चंद्रकांत पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपासंदर्भातही भाष्य केले. धनंजय मुंडे यांचे वर्तन नैतिकतेत आणि कायद्यात बसते का, याचे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्यावे. आम्ही या प्रश्नावरुन विधानसभेत राज्य सरकारला धारेवर धरणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले. त्यामुळे राज्य सरकारने करुणा शर्मा प्रकरणात बाजू मांडावी. देवेंद्र फडणवीसही याच मताचे असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांचीही घोषणा, अयोध्येला जाणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्या (Raj Thackeray Ayodhya) दौरा करणार आहेत. येत्या 1 मार्च ते 9 मार्चदरम्यान राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी दिली. राज ठाकरे यांच्या या दौऱ्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Ayodhya) यांना विचारलं असता, ते म्हणाले, मी सुद्धा अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले.

राज ठाकरे यांचा अयोध्येला जाण्याचा निर्णय चांगला आहे. सगळ्यांनीच अयोध्येला गेलं पाहिजे, मी देखील जाणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अण्णा हजारेंविषयी आदर, उपोषण करु नये: चंद्रकांत पाटील

अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी 30 जानेवारीपासून राळेगणसिद्धीत उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांकडून अण्णा हजारे यांचे मन वळविण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

याविषयी चंद्रकांत पाटील यांना विचारणा झाली असता त्यांनी म्हटले की, अण्णा हजारे यांच्याविषयी सगळ्यांना आदर आहे. त्यांनी उपोषण करु नये, असे आम्हाला वाटत असल्याचे पाटील यांनी म्हटले.

(BJP Chandrakant Patil on alliance with MNS)

म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....