मुंबई – भाजपाला शिवसेनेसोबत युती करण्यात काडीचाही रस नसल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. आम्हाला शिवसेनेचा व्यवहार पटत नाही. राज्यात जे काय चालू आहे ते चुकीचे चालू आहे. त्यामुळे यापुढे शिवसेनेसोबत युती करण्याचा प्रश्नच येत नाही. बाळासाहेबाची शिवसेना आणि या सध्याच्या शिवसेनेमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे आम्ही शिवसेनेसोबत युती करणार नाही, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. विषेश म्हणजे शिवसेना आणि भाजपाने एकत्रं यायला हवे, या युतीला पर्याय नसल्याचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी नुकतेच म्हटले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी आम्ही शिवसेनेसोबत युती करण्यास इच्छूक नसल्याचे म्हटले आहे.
ज्या कारणाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली, त्या बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याचा प्रत्यय मला आहे. सध्याचं जे गणित आहे ते चुकलेलं आहे. हे सुधारायचं असेल तर शिवसेना आणि भाजप एकत्रं आल्याशिवाय पर्याय नाहीच, असं रोखठोक मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केलं.अभिनेते विक्रम गोखले यांनी मीडियाशी संवाद साधताना हे मत व्यक्त केलं. शिवसेना-भाजप एकत्र यावेत म्हणून माझे प्रयत्न सुरू आहेत. ज्यांना – ज्यांना खरच वाटतं की शिवसेना – भाजप युती व्हावी त्यांनी देखील शिवसेना- भाजप युतीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन विक्रम गोखले यांनी केले होते. परंतु गोखलेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारला असता, आम्हाला युतीची इच्छा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बाळासाहेबांवर माझे प्रेम आहे. हे प्रेम राजकीय किंवा बेगडी नाही. भाजप -शिवसेना एकत्र यावेत या इच्छेतून मी बाळासाहेंबावर प्रेम करतो असे नाही. असेही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, बाळासाहेबांची शिवसेना आणि आताची शिवसेना यामध्ये जमीनअस्मानचा फरक आहे. मी मुंबईमध्ये राहातो, माझ्या घराच्या चारही बाजुने मुस्लिम वस्ती होती. जेव्हा दंगे व्हायचे तेव्हा भीतीचे वातावरण असायचे मात्र त्याकाळची शिवसेना आम्हाला पंधरा-पंधऱा दिवस माझ्या घरापासून जवळच असलेल्या नारळवाडी परिसरात सुरक्षीतपणे स्थलांतरीत करायची. बाळासाहेब असताना आम्हाल कशाचीही भीती नव्हती. म्हणूनच माझे बाळासाहेबावरील प्रेम हे राजकीय नसून, त्यांच्यावर असलेल्या श्रद्धेपोटी आहे.
संबंधित बातम्या