श्रीगोंदा (अहमदनगर) : अहमदनगरला श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीत गड आला, पण सिंह गेला, अशी भाजपची अवस्था झाली आहे. भाजपच्या सर्वाधिक 19 पैकी 11 जागा येऊन देखील भाजप नेते बबनराव पाचपुते यांना धक्का बसला आहे. कारण अघाडीचे राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांनी बाजी मारली आहे. प्रतिष्ठेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या सुनीता शिंदे यांचा पराभव, तर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या शुभांगी पोटे यांचा 1608 मतांनी विजयी झाला.
तसेच, हा विजय धनशक्ति विरुद्ध जनशक्ती चा विजय आहे. तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री आणि भाजपचे नेते बबनराव पाचपुते यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोडी केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांनी केलाय. शिवाय, केंद्रात आणि राज्यात भाजपच सरकार फसवणूक करतंय, त्यामुळे लोकांनी आघाडीवर विश्वास दाखवलाय अस मत राहुल जगताप यांनी व्यक्त केलाय.
शहरात राहिलेली कामे पूर्ण करण्याचं आश्वासन नवनिर्वाचित नगराध्यक्ष शुभांगी पोटे यांनी दिलंय. त्याचबरोबर, शहर सुंदर आणि स्वच्छ होण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असून महिलांचे प्रश्नांना प्राधान्य देण्यात येईल, असे पोटे यांनी सांगितलंय.
तसेच, या निकालाचा परिणाम लोकसभा आणि विधानसभेत काय होतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
श्रीगोंदा नगरपरिषद निकाल (एकूण जागा – 19) :
प्रभागनिहाय विजयी उमेदवार :
प्रभाग 1
प्रभाग 2
प्रभाग 3
प्रभाग 4
प्रभाग 5
प्रभाग 6
प्रभाग 7
प्रभाग 8
प्रभाग 9