तर ओबीसींचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी करावं, छगन भुजबळ यांची खुली ऑफर
राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत लोणावळ्यात ओबीसी चिंतन (OBC Lonavala meeting) बैठक होत आहे. या बैठकीपूर्वी छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे.
लोणावळा, पुणे : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी एकीकडे भाजपने चक्का जाम आंदोलन (BJP Chakka Jam Agitation) केलं आहे, तर दुसरीकडे राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत लोणावळ्यात ओबीसी चिंतन (OBC Lonavala meeting) बैठक होत आहे. या बैठकीपूर्वी छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे. “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ओबीसींचं नेतृत्त्व करावं आणि केंद्र सरकारकडे जाऊन इम्पेरिकल डाटा मागावा” असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. (BJPs Devendra Fadnavis should lead and collect OBC empirical data from Center government offers Maharashtra Minister Chhagan Bhujbal)
ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावं म्हणून राज्य सरकार आणि ओबीसी संघटना लवकरच सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत, असं भुजबळांनी नमूद केलं. केंद्र सरकारकडे ओबीसींच्या इंम्पेरीकल डाटाची मागणी आम्ही करतोय. भाजपचं आजचं आंदोलन राजकारणापोटी आहे. त्यांना दाखवायचं आहे की आम्ही ओबीसींसोबत आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी नेतृत्त्व करावं आणि केंद्र सरकारकडे जाऊन इम्पेरिकल डाटा मागावा” असं भुजबळ म्हणाले.
गेल्या 15 महिन्यात कोरोनामुळे कुणी कुणाच्या घरी जाऊ शकत नव्हतं, म्हणून इंम्पेरिकल डाटा गोळा करणं शक्य झालं नाही. कोरोना संपेपर्यंत इंम्पेरिकल डेटा गोळा करणं शक्य नाही, असंही छगन भुजबळ म्हणाले.
लोणावळ्यात ओबीसी चिंतन बैठक
ओबीसी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी पुणे जिल्ह्यातील लोणावळा भागात चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बैठकीला नोटीस बजावली आहे. या बैठकीला विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे असे सर्व पक्षांचे नेते चिंतन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. पोलिसांनी नोटीस बजावली, तरीही ही चिंतन बैठक होणार असं आयोजकांपैकी एक ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांना सांगितलं.
VIDEO : छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
संबंधित बातम्या
OBC Meeting | लोणावळ्यातील सर्वपक्षीय ओबीसी चिंतन बैठकीला पोलिसांची नोटीस