भाजपची अमरावतीतून नवनीत राणा यांना उमेदवारी, एनडीएवर परिणाम होणार?

भाजपने आपल्या उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे. महत्त्वाचे म्हणजे सातव्या यादीत अमरातीमधून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्या भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहे. दुसरीकडे एनडीएमधील घटक पक्षातील स्थानिक नेते यामुळे नाराज झाले आहेत.

भाजपची अमरावतीतून नवनीत राणा यांना उमेदवारी, एनडीएवर परिणाम होणार?
Follow us
| Updated on: Mar 27, 2024 | 8:59 PM

Navneet Rana : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये अमरावती मतदारसंघातून भाजपने नवनीत राणा यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे आता एनडीएमध्ये असलेल्या इतर पक्ष नाराज होण्याची शक्यता आहे. अमरावतीतून भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली असली तरी महायुतीत राणा यांना प्रचंड झाला होता. आता मीही याच जागेवरून निवडणूक लढवणार असल्याचे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी सांगितले आहे. प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू यांनीही नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.

नवनीत राणा या अमरावतीच्या खासदार आहेत. त्यांनी 2019 मध्ये अमरावतीमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांनी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता.

नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करणार

नवनीत राणा या आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांना पक्षाचे सदस्यत्व देणार आहेत. बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री बैठक बोलावण्यात आली आहे. ज्यांचे तिकीट कापले जाऊ शकते अशा शिवसेना नेत्यांची आणि खासदारांचीही बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात ही बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटप निश्चित करण्यात येणार असून, त्यामुळे उद्याच त्याची घोषणा होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

आनंदराव अडसूळ बंडखोरी करणार?

महाराष्ट्रात भाजपने अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेसोबत युती केली आहे. शिंदे गटातील आनंदराव अडसूळ यांनी भाजपकडून नवनीत राणा यांना तिकीट देण्यास विरोध केला आहे. त्यामुळे आता आनंदराव अडसूळ यांनी नाराजी एकनाथ शिंदे कशी दूर करता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

नवनीत राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात हनुमान चालीसावरुन जोरदार टीका केली होती. त्यामुळे नवनीत राणा यांना तुरुंगातही जावे लागले होते. नवनीत राणा यांचे पती आणि आमदार रवी राणा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मानले जातात. याआधी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.