Uddhav Thackeray : ‘मला जे 2019 ला समजलं ते नितीश कुमारांना आता कळलं’, उद्धव ठाकरेंकडून नितीश कुमारांच्या भूमिकेचं स्वागत, भाजपवर निशाणा

शिवसेनेतून ज्या आमदार-खासदरांनी बंडाची भूमिका घेतली त्यावर आता पक्षप्रमुख उघडपणे बोलू लागले आहेत. ज्यांनी शिवसेनेबाबत गद्दारी आणि माझ्या पाठीत खंजीर खुपसला त्यांना जनता स्विकारणार नाही. ज्यांनी शिवसेनेसोबत अशा प्रकारचे कृत्य केले त्यांचे राजकीय भवितव्य काय हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदार हे निवडुण येऊ शकत नाहीत.

Uddhav Thackeray : 'मला जे 2019 ला समजलं ते नितीश कुमारांना आता कळलं', उद्धव ठाकरेंकडून नितीश कुमारांच्या भूमिकेचं स्वागत, भाजपवर निशाणा
उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुखImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 5:44 PM

मुंबई : विरोधी पक्षापेक्षा मित्रपक्षांना आधी संपवणं हे भाजपचं धोरण मला 2019 लाच समजलं होतं. म्हणून मी वेगळा झालो. जे मला 2019 ला समजलं ते नितीश कुमारांना (Nitish Kumar) आता कळलं’, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी बिहारमध्ये नितीश कुमार यांनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत केलं. त्याचबरोबर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची बैठक आज पार पडली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी बिहारमधील राजकीय उलथापालथ आणि भाजपला बसलेल्या हादऱ्यावर भाष्य केलं. इतकंच नाहीत नितीश कुमारांची भूमिका योग्य असल्याचं सांगत त्यांनी त्या भूमिकेचं स्वागतही केलंय. मंत्रिमंडळ विस्ताराच्या (Cabinet Expansion) मुद्द्यावरुन ठाकरे यांनी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांना खोचक टोला लगावलाय.

‘मुंबई महापालिका निवडणुकीत विजयाचा दावा’

उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेला सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार, खासदार निवडून येऊच शकत नाहीत. गेल्या महापालिका निवडणुकीतही आपण भाजप विरोधात लढलो आणि जिंकलो. त्यामुळे या निवडणुकीतही आपणच जिंकणार असा दावा ठाकरे यांनी माजी नगरसेवकांच्या बैठकीत केलाय. त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना काही जणांची तोंडं गोड तर काहींची कडू झाली आहेत. बघुयात हा कडूपणा किती काळत टिकतो ते, अशा शब्दात ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे बच्चू कडूंना टोला हाणला.

‘आपली लढत भाजपसोबतच’

गतवेळी मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपा हे एकमेकांच्या विरोधात लढले होते. तेव्हाही शिवसेना ही जिंकलेलीच होती. त्यामुळे यंदा होऊ घातलेल्या निवडणुकीमध्येही असेच चित्र राहिल. त्यासाठी स्थानिक पातळीवरील संपर्क, लोकांचे प्रश्न आणि संघटन यावर भर द्या असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. एवढेच नाहीतर त्यांनी शिंदे गटाला महत्व न देता आपली लढत ही भाजपाशीच असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पक्षप्रमुखांच्या मार्गदर्शनानंतर आता माजी नगरसेवकांनी किती प्रोत्साहन मिळाले हे तर काळच ठरणार आहे.

मंत्रिमंडळ विस्तार काहींसाठी गोड तर काहींना कडू

मंत्रिमंडळ विस्तारावरुन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर बोचरी टीका केली आहे. या विस्तावरुन नाराजीचा तर सूर आहेच पण ज्यांना याबाबत आत्मविश्वास होता त्यांना देखील माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे हा विस्तार काहींसाठी गोड तर काहींना मात्र, कडवट असल्याचे म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष आ. बच्चू कडू यांच्यावर टीका केली. तर दुसरीकडे महापालिका निवडणुकांच्या अनुशंगाने त्यांनी नगरसेवकांशी साधलेला संवाद उर्जा देणारा ठरणार आहे.

ही बातमी पण वाचा

Airtel 5G Network: ‘एअरटेल’ भारतीय ग्राहकांसाठी 5G क्रांती आणण्यासाठी सज्ज!

मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.