Maharashtra Assembly Session 2022 : विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर, शिवसेनेच्या राजन साळवी यांचा पराभव

Maharashtra Assembly Session 2022 : विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पाडली. भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षपदासाटी राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.

Maharashtra Assembly Session 2022 : विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर, शिवसेनेच्या राजन साळवी यांचा पराभव
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 11:58 AM

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर (rahul narvekar) निवडून आले आहेत. तर शिवसेनेच्या राजन साळवी (rajan salvi) यांचा पराभव झाला आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नार्वेकर यांना 164 मते पडली. तर राजन साळवी यांना केवळ 107 मते मिळाली. त्यामुळे नार्वेकर हे मोठ्या फरकाने विजयी झाले. या विजयानंतर भाजप (bjp) आमदारांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं. तर विधानभवन परिसरात भाजपच्यावतीने मोठा जल्लोष करण्यात आला. शिवसेना आणि शिवसेना बंडखोरांमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या संघर्षात बंडखोरांनी भाजपच्या साथीने पहिली लढाई जिंकली आहे. आता विश्वासदर्शक ठरावाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी जावई आणि विधान परिषदेच्या सभापतीपदी सासरे बसलेले दिसणार आहेत.

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पाडली. भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षपदासाटी राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला गिरीश महाजन यांनी अनुमोदन दिलं. तर चेतन तुपेंकडून राजन साळवी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं कामकाज सुरू होताच राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी पोल मागितला. त्यानंतर झिरवळ यांनी मतदान प्रक्रिया सुरू करण्यास प्रशासनाला आदेश दिले. त्यानंतर प्रत्येक सदस्यांजवळ जाऊन त्यांचे नाव नोंदवून घेतले गेले आणि मतदान प्रक्रिया पार पडली.

हे सुद्धा वाचा

राहुल नार्वेकर यांचा विजय

या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर यांचा दणदणीत विजय झाला आहे. तर राजन साळवी यांचा पराभव झाला आहे. राहुल नार्वेकर यांना 164 मते मिळाली. तर साळवी यांना 107 एवढ्याच मतांवर समाधान व्यक्त करावं लागलं. नार्वेकर हे 57 मतांच्या मताधिक्याने विजयी झाले. तर, या निवडणुकीत तीन आमदार तटस्थ राहिले.

पाटील-फडणवीस जुगलबंदी

विधानसभेच्या पहिल्याच दिवशी आज राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चांगलीच जुगलबंदी रंगली. विधानसभेचं कामकाज सुरू होताच जयंत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आभार मानण्यास सुरुवात केली. मी राज्यपालांचे आभार मानण्यासाठी उभा आहे. गेले अनेक महिने विधानसभेला याची प्रतिक्षा होती. आमच्या सरकारकडून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची वारंवार विनंती केली होती. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनीही राज्यपालांना भेटून वारंवार विनंती केली. त्यांनी मान्य केली नाही. ते कशाची वाट पाहत होते हे आज आमच्या लक्षात आलं. ते त्यांनी आधीच सांगितलं असतं तर कदाचित एकनाथरावांनी हे यापूर्वीच केलं असतं. त्यामुळे राज्यपाल महोदयांनी ही मागणी केली त्याबद्दल त्यांचे आभार मानावेत. महाराष्ट्र आणि देशाला राज्यपाल कसा आदर्श घालू शकतो हा एक आदर्श राज्यपालांनी घातला आहे. राज्यपालांना विनंती आहे की त्यांनी आता विधान परिषदेच्या 12 सदस्यांची नावे मंजूर करावी. आम्ही पाठवल्याप्रमाणे मंजूर करावी. त्यामुळे राज्यपाल सर्वांशी समान वागले हा मेसेज जाईल, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

त्यावर देवेंद्र फडणवीस तात्काळ बोलण्यास उभे राहिले. मी नानाभाऊ पटोलेंचे आभार मानतो. त्यांच्यामुळे आम्हाला हा दिवस पाहायला मिळाला. ते आमचे मित्रंच आहेत. ते मैत्रीला जागले म्हणून आभार मानतो, असं फडणवीस यांनी म्हणताच सभागृहात एकच खसखस पिकली.

कुणाचे मतदान कुणाला?

  1. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मनसेने भाजपच्या राहुल नार्वेकर यांना मतदान केलं.
  2. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनेही भाजपला मतदान केलं.
  3. समाजवादी पार्टीच्या दोन्ही आमदारांनी मतदान करणं टाळलं. ते तटस्थ राहिले. अबू आजमी आणि रईस शेख हे आपल्या जागेवरच बसून राहिले. त्यांनी मतदानात भाग घेतला नाही. त्यामुळे आघाडीची दोन मते कमी झाली.
  4. या निवडणुकीत एमआयएमचा एक सदस्यही तटस्थ राहिला.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.