Rajya Sabha Election: भाजपलाच राज्यसभेची तिसरी जागा का मिळावी?; चंद्रकांतदादांनी आघाडीच्या नेत्यांना सांगितले तीन लॉजिक

Rajya Sabha Election: आघाडीच्या नेत्यांनी आमचा उमेदवार राज्यसभेत पाठवा. तुम्हाला विधान परिषदेत पाठिंबा देतो, असा प्रस्ताव भाजपला दिला. त्यावर हाच प्रस्ताव उलटा केला तर? असा सवाल भाजपने केला.

Rajya Sabha Election: भाजपलाच राज्यसभेची तिसरी जागा का मिळावी?; चंद्रकांतदादांनी आघाडीच्या नेत्यांना सांगितले तीन लॉजिक
भाजपलाच राज्यसभेची तिसरी जागा का मिळावी?; चंद्रकांतदादांनी आघाडीच्या नेत्यांना सांगितले तीन लॉजिक Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 2:06 PM

मुंबई: राज्यसभा निवडणुकीतून (Rajya Sabha election) अर्ज मागे घेण्यासाठी अवघे दोन तास उरले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि महाविकास आघाडीच्या (mahavikas agahdi) नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यसभा बिनविरोध करण्याचं आवाहन भाजप नेत्यांना केलं. राज्यसभेचा तुमचा उमेदवार मागे घ्या. त्या बदल्यात आम्ही तुम्हाला विधान परिषदेत मदत करू, असं महाविकास आघाडीने भाजपला सांगितलं. पण भाजपने हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. उलट तुम्हीच आम्हाला राज्यसभेला मदत करा. आम्ही तुम्हाला विधान परिषदेला मदत करू, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी आघाडील तीन लॉजिक दिले आहेत. भाजपसाठी ही जागा किती महत्त्वाची आहे. याबाबतचे हे लॉजिक आहेत. मात्र, आघाडीच्या नेत्यांनी उमेदवार मागे घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक होणारच असल्याचं स्पष्ट झालं आहे.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, शिवसेना नेते अनिल देसाई आणि काँग्रेस नेते सुनील केदार आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आले होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या पाच नेत्यांमध्येच राज्यसभेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. तब्बल तासभर ही चर्चा झाली. त्यानंतर चंद्रकांत पाटील आणि छगन भुजबळ यांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेऊन चर्चेतील तपशील सांगितला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी चर्चेचा तपशील सांगतानाच राज्यसभेची जागा भाजपला का हवी आहे याचं लॉजिकही आघाडीच्या नेत्यांना सांगितल्याचं स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

पहिलं लॉजिक काय?

चंद्रकांत पाटील यांनी राज्यसभेच्या जागेबाबत आघाडीच्या नेत्यांना तीन लॉजिक सांगितले. त्यापैकी पहिलं लॉजिक म्हणजे मागच्यावेळी राज्यसभेवर आमचे तीन सदस्य निवडून गेले होते. त्यांचा कार्यकाळ संपल्याने ही जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे नैसर्गिक न्यायाने ही जागा भाजपचीच आहे. त्यामुळे आम्ही ही जागा लढवत असून आघाडीने आम्हाला पाठिंबा द्यावा. हव तर विधान परिषदेत आम्ही पाचवा उमेदवार देणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी आघाडीच्या नेत्यांना सांगितलं.

दुसरं लॉजिक काय?

चंद्रकांतदादांनी दुसरं लॉजिक देताना थेट आकड्यांवरच बोट ठेवलं. आमच्याकडे 24 मते आहेत. आमच्या सहयोगींचे सहा मते आहेत. म्हणजे आमच्याकडे एकूण 30 मते आहेत. आम्हाला फक्त 11 ते 12 मते कमी पडत आहेत. आघाडीच्या मतांचा आकडा 30च्या पुढे जात नाही. आमच्या मागच्यावेळी तीन जागा होत्या त्या मिळाव्या हे लॉजिक आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

तिसरं पण महत्त्वाचं लॉजिक

चंद्रकांत पाटील यांनी तिसरं लॉजिक दिलं. तेही महत्त्वाचं आहे. आघाडीच्या नेत्यांनी आमचा उमेदवार राज्यसभेत पाठवा. तुम्हाला विधान परिषदेत पाठिंबा देतो, असा प्रस्ताव भाजपला दिला. त्यावर हाच प्रस्ताव उलटा केला तर? असा सवाल भाजपने केला. तुम्ही आम्हाला राज्यसभा सोडा, आम्ही तुम्हाला विधान परिषद सोडतो, असं भाजपने स्पष्ट केलं. त्यावर तुमचे राज्यसभेत भरपूर खासदार आहेत. आमचा एखादा पाठवू द्या. तेवढाच एक आकडा वाढेल, असं आघाडीच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलं, असं पाटील म्हणाले. त्यावर आम्हीही आमची भूमिका मांडली. त्यांना जशी त्यांच्या आघाडीची काळजी आहे. तशी आम्हाला आमच्या पक्षाची काळजी आहे. आमच्या उमेदवाराला पार्टीचा एबी फॉर्म दिला आहे. तिसरा उमेदवार मागे घेणं आमच्या लेव्हलाल शक्यच नाही. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. आम्हाला राज्यसभा अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे आमचा क्लेम लॉजिकच्या आधारे आहे, असं आघाडीच्या नेत्यांना सांगितल्याचंही पाटील यांनी स्पष्ट केलं.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.