BMC Elections 2022 : शिंदे गट-भाजपची महापालिका निवडणुकीसाठी तिहेरी रणनिती! पडद्यामागून मनसेची मदत घेणार?

BMC Election 2022 : दिवाळी नंतर मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या तयारीला सगळेच पक्ष लागलेत. त्या पार्श्वभूमीवर एक मोठी अपडेट हाती येतेय.

BMC Elections 2022 : शिंदे गट-भाजपची महापालिका निवडणुकीसाठी तिहेरी रणनिती! पडद्यामागून मनसेची मदत घेणार?
महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड
Follow us
| Updated on: Sep 19, 2022 | 9:44 AM

मुंबई : पालिका निवडणुकांच्या (Maharashtra Municipal Corporation Elections 2022) पार्श्वभूमीवर मोठी राजकीय बातमी समोर येतेय. शिंदे गट आणि भाजप आगामी महापालिका (BMC Elections 2022) निवडणुकीसाठी तिहेरी रणनिती आखण्याच्या तयारीत आहे. या निवडणुकीत शिवसेनेला (Shiv sena vs BJP) धक्का देण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सज्ज झालेत. आगामी पालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे गट एकत्र युती करुन निवडणुकीला सामोरं जातील, हे आधीच स्पष्ट झालंय. मात्र मनसेशी थेट युती करणं भाजप आणि शिंदे फडणवीसांकडून टाळलं जाणार आहे, अशी माहिती आता सूत्रांनी दिलीय. मनसेशी शिंदे-फडणवीसांनी युती करणं टाळणं, हे अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण मानलं जातंय.

तिहेरी रणनिती कशासाठी? : पाहा व्हिडीओ

विरोधकांचा समाचार घेण्यासाठी जाणीवपूर्वक मनसेचे स्वातंत्र्य अबाधित राखलं जाईल, असं सांगितलं जातंय. त्यामुळे पडद्यामागून मनसेला मदत होण्याची शक्यताय. मनसेकडून 227 वॉर्डात निवडणूक लढण्याची तयारी सुरू असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई पालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना मात देण्यासाठी शिंदे-फडणवीस यांच्याकडून व्यूहरचना आखण्यास सुरुवात झालीय. त्याचाच भाग म्हणून ही तिहेरी रणनिती असेल, असं सूत्रांनी सांगितलंय.

हे सुद्धा वाचा

फक्त शिवसेनाच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनाही मुंबई महानगरपालिका निवडणुकीत धूळ चारण्यासाठी तिहेरी रणनिती फायदेशीर ठरते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मनसेला थेट आपल्यासोबत न घेता विरोधकांना दणका देण्यासाठी चतुराईने रणनिती आखण्याचा प्रयत्न आता शिंदे आणि भाजप यांच्याकडून केला जात असल्याचं पाहायला मिळतंय.

मनसेला भाजप आणि शिंदे गटाकडून अप्रत्यक्षपणे मदत केली जाईल, अशी शक्यता आता निर्माण झालीय. त्यामुळे जागावाटपाच्या प्रश्नाचा तिढाही निर्माण होण्याची शक्यात उरणार नाही. शिवाय मनसे मुंबई पालिकेत सर्व जागा लढेल, असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही म्हटलं होतं. त्यामुळे 227 पैकी काही जागांवर अप्रत्यक्षपणे किंवा पडद्यामागून मनसेला भाजप आणि शिंदे गटाने मदत केली तर आश्चर्य वाटू नये, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

पालिका निवडणुका कधी?

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका कधी लागणार, याची उत्सुकता आता ताणली गेली आहे. दिवाळी नंतर मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका होणार की त्याआधी हे पाहणं महत्त्वाचंय. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या लढाईत मुंबई महानगर पालिकेची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक ठरणार आहे. आपल्या अस्तित्त्वाची परीक्षा जणू पालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेची आणि उद्धव ठाकरेंची असेल. त्यामुळे या निवडणुकीसाठी भाजप कडून राजकीय डावपेच आखण्यास सुरुवातही झाली आहे. तिहेरी रणनिती हा त्याचाच एक भाग असल्याचं सांगितलं जातंय.

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.