Ashish Shelar | मुंबईला बदल हवाय, भाजपने महापालिका निवडणूक प्रचाराचं रणशिंग फुंकलं, आशिष शेलारांचे शिवसेनेवर चौफेर आरोप…

पमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadanvis) यांच्या उपस्थितीत आशिष शेलार यांनी षण्मुखानंद हॉलमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला  मार्गदर्शन केलं.

Ashish Shelar | मुंबईला बदल हवाय, भाजपने महापालिका निवडणूक प्रचाराचं रणशिंग फुंकलं, आशिष शेलारांचे शिवसेनेवर चौफेर आरोप...
आशिष शेलार, मुंबई भाजप शहराध्यक्ष Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 1:47 PM

मुंबईः मुंबईकर ज्या ज्या आघाड्यांवर लढतो, त्या समस्यांना तोंड देणारा नेता भाजप श्रेष्ठींनी अध्यक्ष पदावर नियुक्त केलाय. त्यामुळे सामान्य मुंबईकरांना (Mumbaikar) आता झगडण्याची गरज नाही. मुंबईला बदल हवाय, एवढी वर्ष फसवणूक करणाऱ्या शिवसेनेपासून बदल हवाय, असं जाहीर वक्तव्य करत मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा केला. षण्मुखानंद हॉलमध्ये आज भाजपतर्फे भव्य मेळावा आयोजित करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadanvis)यांच्या उपस्थितीत आशिष शेलार यांनी या मेळाव्याला  मार्गदर्शन केलं. भाजप श्रेष्ठींनी मला तिसऱ्यांदा मुंबईच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. हे पद मला नाही तर प्रत्येक आघाडीवर लढणाऱ्या सामान्य मुंबईकराला दिलंय, असं वक्तव्य शेलार यांनी केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शेलार यांनी या प्रसंगी शिवसेनेच्या महापालिकेतील कामावर जोरदार टीका केली.

… यासाठी मला अध्यक्ष बनवलंय’

भाजपने अध्यक्षपद का दिलं, यावर बोलताना आशीष शेलार म्हणाले, ‘ भाजपने मला पुन्हा एकदा मुंबईचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. मी तिसऱ्यांदा अध्यक्ष बनतोय. मी आज कार्यकर्त्यांचं मनापासून धन्यवाद देतो. पक्षाने आशिष शेलारला अध्यक्ष बनवलं नाही तर एका विचाराला, समस्येला, एका जागृतीला अध्यक्ष बनवलंय. सात रस्त्याच्या कुंभारचाळीत राहणाऱ्या व्यक्तीला.. एका चाळकरीला अध्यक्ष केलंय. जो मुंबईत म्हाडाच्या संक्रमण शिबीरात स्वतःचं घर पुन्हा स्वप्नवत होईल की नाही, यासाठी झुंजणाऱ्या मुंबईकराला अध्यक्ष केलंय. आग्री कोळी, झोपडपट्टीत घराचं पुनर्विकासाचं स्वप्न पाहणाऱ्या… लालबागचा राजा एक वर्ष बसू शकला नाही, त्या गणेशभक्तांची पीडा माहिती असलेल्याला अध्यक्ष बनवलंय. नवरात्र, गोविंदा या उत्सवप्रेमींची स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्यांना अध्यक्ष बनवलंय… नळ २४ तास पण पाणी २ ता, तेही अश्रू गळून… नाल्यातलं पाणी घरात घुसतं, ही समस्या सोडवणाऱ्याला अध्यक्ष बनवलंय…..’

आता मुंबईकरांना बदल हवाय…

आता मुंबईकरांना कोण हवंय, असा सवाल करत आशिष शेलार म्हणाले, ‘ आता मुंबईकरांना मालवणीच्या झोपडपट्टीत हिंदूंवर अन्यायाविरोधात संघर्ष करणारा मंगलप्रभात लोढा हवाय, मुंबईत कुर्ल्याच्या झोपडपट्टीत राहणाऱ्यांना स्वतःचं घर मिळण्यासाठी संघर्ष करणारा गोपाळशेट्टी हवाय, टोल नाक्यावरील भ्रष्टाचाराचा बिमोड करणारा मनोज कोटक हवाय, सोसायटी-चाळीचं घर विकसित करण्यासाठी संघर्ष करणारी पूनमताई महाजन हवी आहे, घरासाठी संघर्ष करणारा अतुल भातखळकर हवाय ..’

शिवसेनेवर जहरी टीका?

शिवसेनेनं आतापर्यंत फक्त महापालिकेत फक्त भ्रष्टाचार केल्याचा आरोप आशिष शेलारांनी केला. ते म्हणाले, ‘ 45 हजार कोटींचं बजेट असलेल्या मुंबईत शिवसेनेनं काय केलं. देशातल्या सात राज्यांचं बजेट मुंबईपेक्षा कमी आहे. पण सुविधा काय दिल्यात? मुंबईला मेट्रो देवेंद्र फडणवीसांनी दिली. मुंबईचे पूल भाजपच्या नितीन गडकरींनी दिले. अंडरवर्ल्डचा कर्दनकाळ हेरून तिला सुरक्षित करण्याचं काम गोपीनाथ मुंडेंनी केलं. कोस्टल रोडची परवानगी फडणवीसांनी दिली. मिठीला स्वच्छ करण्यासाठी केंद्राने निधी केला. पण शिवसेनेनं फक्त भ्रष्टाचार दिला. ही लढाई अधर्म, घराणेशाहीच्या विरोधात आहे. मुंबईकर गुदमरलाय… टाहो फोडतोय, आम्हाला लोकशाहीचं सरकार हवंय… ‘

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.