अभिनेत्री उर्मिला मातोंडकर निवडणूक लढणार? मतदारसंघ आणि पक्ष ठरला?

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून उर्मिला मातोंडकरला काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता असून, उर्मिलाला काँग्रेसकडून तिकीट मिळाल्यास भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचं आव्हान तिच्यासमोर असेल. येत्या दोन तीन दिवसात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. उत्तर […]

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर निवडणूक लढणार? मतदारसंघ आणि पक्ष ठरला?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून उर्मिला मातोंडकरला काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता असून, उर्मिलाला काँग्रेसकडून तिकीट मिळाल्यास भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचं आव्हान तिच्यासमोर असेल.

येत्या दोन तीन दिवसात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून 2014 साली काँग्रेसकडून मुंबई काँग्रेसचे संजय निरुपम मैदानात होते. मात्र, भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी मोठ्या फरकाने संजय निरुपम यांचा पराभव केला होता. यंदा संजय निरुपम यांच्याऐवजी नव्या उमेदवाराचा शोध उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी केला जातो आहे.

उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी हे भाजपचे तगडे उमेदवार असून त्यांच्याविरोधात एखादा लोकप्रिय आणि ग्लॅमरस चेहरा देण्याची काँग्रेसची रणनीती आहे. काँग्रेसकडून या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री आसावरी जोशी आणि अभिनेत्री शिल्पा शिंदे यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र, काँग्रेसकडून आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

निवडणुकीच्या तारखा जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.