वाजत या, गाजत या, शिवाजी पार्क शिवसेनेचेच; अखेर दसरा मेळाव्याची परवानगी शिवसेनेलाच!

शिंदे गट आणि शिवसेनेला मैदान मिळवण्याचा कोणताही अधिकार नाही. मैदान महापालिकेच्या ताब्यात आहे. तसेच हे मैदान सायलेन्स झोनमध्ये येते. त्यामुळे मैदान कुणाला देता येणार नाही.

वाजत या, गाजत या, शिवाजी पार्क शिवसेनेचेच; अखेर दसरा मेळाव्याची परवानगी शिवसेनेलाच!
shivsenaImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 23, 2022 | 5:18 PM

मुंबई: दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क (shivaji park) मैदान कुणाला मिळणार? यावरून शिंदे गट आणि शिवसेनेत (shivsena) सुरू असलेला वाद अखेर मिटला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय देत हे प्रकरण निकाली काढलं आहे. शिवसेनेला कोर्टाने अखेर परवानगी दिली आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची याचिका फेटाळतानाच कोर्टाने मुंबई महापालिकेचं म्हणणंही खोडून काढलं आहे. त्यामुळे यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानातच होणार आहे. या मेळाव्यात आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शिवसेना आणि शिंदे गटाने शिवाजी पार्क मैदान मिळावं म्हणून कोर्टात याचिका दाखल केली होती. त्याची आज सुनावणी पार पडली. शिवसेनेकडून वकील एसपी चिनॉय आणि मुंबई महापालिकेकडून वकील मिलिंद साठ्ये यांनी युक्तिवाद केला. शिंदे गटाच्या वकिलानेही यावेळी जोरदार युक्तिवाद केला. तब्बल चार तास हा युक्तिवाद चालला.

यावेळी कोर्टाने महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली. खरी शिवसेना कोणती यात आम्हाला पडायचं नाही, असंही कोर्टाने म्हटलं. तसेच शिवसेनेला यापूर्वी दसरा मेळाव्याची परवानगी मिळाली होती, असं सांगतानाच दोन्ही गटाचे अर्ज नाकारण्याचा पालिकेचा निर्णय योग्यच होता, असंही कोर्टाने म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

आम्ही कोरोना काळात शिवाजी पार्क मैदान मेळाव्यासाठी मागितलं नाही. दसरा मेळावा हा शिवसेनेचा इतिहास आहे. त्यामुळे मूळ शिवसेना कुणाची हा मुद्दा इथे नाही. दरवर्षी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. त्यामुळे आम्हालाच परवानगी मिळायला हवी. उद्या कोणीही कोणीही वैयक्तिक येऊन परवानगी मागेल तर ते योग्य नाही, असं शिवसेनेचे वकील एसपी चिनॉय यांनी कोर्टात सांगितलं.

मैदानासाठी कुणीही अर्ज करू शकतं ना? असा सवाल यावेळी कोर्टाने केला. त्यावर होय, मैदानासाठी कुणीही अर्ज करू शकतं, असं उत्तर शिवसेनेच्या वकिलाने दिलं. यापूर्वी मनसेनेही शिवाजी पार्कवर परवानगी मागण्याचा प्रयत्न केला होता, याकडेही शिवसेनेच्या वकिलाने कोर्टाचं लक्ष वेधलं.

आम्ही शिवाजी पार्कच्या जागेची आधीच मागणी केलीय. शिवाजी पार्क मैदानासाठी सर्वात आधी कुणी अर्ज केला? असा सवाल कोर्टाने केला. त्यावर आम्हीच पहिल्याादा अर्ज केला. 22 आणि 26 ऑगस्ट रोजी आम्ही अर्ज केला होता. 30 ऑगस्ट रोजी शिंदे गटाचे सदा सरवणकर यांनी अर्ज केला होता, असं शिवसेनेच्या वकिलाने सांगितलं. तसेच शिंदे गटाची याचिका फेटाळून लावण्याची मागणी केली.

यावेळी मुंबई महापालिकेच्या वकिलानेही जोरदार युक्तिवाद केला. शिंदे गट आणि शिवसेनेला मैदान मिळवण्याचा कोणताही अधिकार नाही. मैदान महापालिकेच्या ताब्यात आहे. तसेच हे मैदान सायलेन्स झोनमध्ये येते. त्यामुळे मैदान कुणाला देता येणार नाही. मैदानाची परवानगी नाकारल्याने कुणाच्या अधिकाराचा भंग होण्याचा प्रश्नच नाही, असं महापालिकेच्या वकिलाने म्हटलं. तसेच पोलिसांनी आम्हाला अहवाल दिला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर हे मैदान कुणालाही न देण्याचं पोलिसांनी आपल्या अहवालात म्हटलं आहे, असंही त्यांनी कोर्टाला सांगितलं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.