Video | बाप-लेकीच्या नात्याचा हळवा बंध… संजय राऊत आणि पुर्वशीचा खास व्हिडीओ पाहिलात का?

शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची कन्या पूर्वशी राऊत (Purvashi Raut) 29 नोव्हेंबर रोजी विवाहबंधनात अडकली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह झाला आहे.

Video | बाप-लेकीच्या नात्याचा हळवा बंध... संजय राऊत आणि पुर्वशीचा खास व्हिडीओ पाहिलात का?
Sanjay Raut with Daughter
Follow us
| Updated on: Dec 04, 2021 | 2:11 PM

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची कन्या पूर्वशी राऊत (Purvashi Raut) 29 नोव्हेंबर रोजी विवाहबंधनात अडकली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह झाला आहे. या लग्नसोहळ्याला अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शरद पवार, राज ठाकरे, बाला नांदगावकर, नितीन सरदेसाई, छगन भुजबळ अशा दिग्गज नेत्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.

सध्या राजकाणातील मुसद्दी नेता म्हणून ओळख असलेले संजय राऊतही आपल्या लेकीचा हट्ट पुरवण्यात तिचा लाड करण्यात व्यस्त झालेले दिसले होते. या लग्नसोहळ्यात त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य अगदी स्पष्टपणे दिसले होते.

बाप-लेकीच्या नात्याचा हळवा बंध!

बापासाठी लेकीचं लग्न म्हणजे ओठांवर हास्य ठेवून डोळ्यांच्या ओलावणाऱ्या कडा हळूच लपवण्याचा प्रसंग. तिच्या लहानपणापासूनच्या प्रत्येक आठवणीत हरवण्याचा क्षण. या सोहळ्यात संजय राऊत आणि संपूर्ण राऊत कुटुंबीयही हास्य आणि आनंदाच्या अशाच सोनेरी क्षणात रंगून गेले आहे. दरम्यान लेकीसोबत खास फोटोसेशन करतानाचा संजय राऊत यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

पाहा व्हिडीओ :

संजय राऊत आपल्या लेकीच्या लग्नाची तयारी करण्यात दंग झाले होते. आपल्या लाडक्या प्रिन्सेसच्या लग्न सोहळ्यात कशाचीही कमी पडू नये याची पूरेपर खबरदारी त्यांनी घेतली होती. प्रत्येक बापासाठी आपल्या लेकीचं लग्न खास अन् प्रत्येक लेकीसाठी आपला बाप ‘किंग’च असतो. तिच्यासाठी तो एक पर्वताएवढा आधारही असतो. पण अशा कणखर पर्वतालासुद्धा हळवं मन असतं. बाप-लेकीच्या अशाच अलवार नात्याची झलक राजकारणातील किंगमेकर आणि त्यांच्या लेकीमध्ये दिसून आलीय.

महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी मोलाची भूमिका बजावणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नात एका सामान्य वडिलांप्रमाणे सोहळ्याची लगबग सांभाळताना दिसले होते. संजय राऊत आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब या आनंदसोहळ्यात दंग झाले होते. दरम्यान संजय राऊत आणि त्यांची मुलगी पूर्वशी यांच्यातील हळव्या नात्याची झलक पाहायला मिळाली आहे.

कर्तव्यदक्ष अधिकारी बनले व्याही!

ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी राऊत यांची कन्या पूर्वशी यांचा विवाह पार पडला आहे. राऊत यांचे व्याही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे अत्यंत अभ्यासू, मितभाषी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी समजले जातात. राऊत हे राजकारणातील पॉवरफूल राजकारणी असले तरी त्यांचे व्याही नार्वेकरही धडाडीचे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत.

हेही वाचा :

Sayali Sanjeev | ‘तुला माहित आहे नं बाबा माझं तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम होतं..’, ‘पितृछत्र’ हरपल्यानंतर सायलीची भावूक पोस्ट

Swara Bhasker | ‘तुझ्याशी लग्न कोण करेल..?’, मुल दत्तक घेण्याच्या स्वराच्या निर्णयावर चाहते का नाराज?

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.