Budget 2022 : यंदाचा अर्थसंकल्पही सर्वसामान्य नागरिकाला समर्पित असेल, देवेंद्र फडणवीसांचा दावा

आर्थिक पाहणी अहवालात आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये जीडीपी ग्रोथ 9.2 टक्के राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं कौतुक केलं. तसंच यंदाचा अर्थसंकल्पही सामान्य माणसाला समर्पित असेल असा दावाही फडणवीस यांनी केला आहे.

Budget 2022 : यंदाचा अर्थसंकल्पही सर्वसामान्य नागरिकाला समर्पित असेल, देवेंद्र फडणवीसांचा दावा
देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 7:37 PM

पणजी : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या (Union Budget 2022) पूर्वसंध्येला आज आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी आर्थिक पाहणी अहवाल 2021-22 आज लोकसभेत (Loksabha) सादर केला. या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2023 मध्ये देशाचा जीडीपी 8 ते 8.5 राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी ब्यूरोने जीडीपी ग्रोथ 9.2 टक्के राहिल असा अंदाज व्यक्त केला होता. मागील आर्थिक वर्षात जीडीपीमध्ये 7.3 टक्के घसरण पाहायला मिळाली होती. आर्थिक पाहणी अहवालात आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये जीडीपी ग्रोथ 9.2 टक्के राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं कौतुक केलं. तसंच यंदाचा अर्थसंकल्पही सामान्य माणसाला समर्पित असेल असा दावाही फडणवीस यांनी केला आहे.

आर्थिक पाहणी अहवाल सादर झाल्यानंतर फडणवीस म्हणाले की, ‘खरं म्हणजे आज जो आर्थिक पाहणी अहवाल आपण पाहिला. त्यातून आपल्या अर्थव्यवस्थेचं जे आऊटलूक आहे ते अत्यंत प्रॉमिसिंग दिसत आहे. मोठं रिव्हायव्हल त्यात पाहायला मिळत आहे. जी कोविडनंतर अत्यंत समाधानकारक बाब आहे. आतापर्यंत पंतप्रधान मोदींचं बजेट हे प्रो पिपल असं राहिलं आहे आणि मला विश्वास आहे की उद्या सादर होणारं बजेटही प्रो-पिपल असंच असणार आहे. हे सामान्य माणसाला समर्पित बजेट असेल. आमच्या इकॉनॉमिक रिव्हायव्हलला प्ल्यूएल करणारं बजेट असेल’, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय.

पृथ्वीराज चव्हाण यांना टोला

पृथ्वीराज चव्हाण यांनी आरोप केला आहे की कोविड काळात देशाचा जीडीपी हा उणेमध्ये होता. असं असतानाही त्यांनी तो चार टक्के असा दाखवला. त्याबाबत विचारलं असता फडणवीस म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण साहेब हे कुठलेही आकडे शोधून आणतात आणि कुठेही सांगतात. अर्धवट आकडे सांगायचे, सोयीचे आकडे सांगायचे आणि त्यावर बोलायचं. आकडे हे स्टॅटिस्टिक विभाग ठेवतो. तो रेकॉर्डचा भाग असतो. त्याप्रमाणेच हे आकडे समोर आले आहेत. त्यांना वाईट याचं वाटतं की, इतका कोविड झाला. जगाची अर्थव्यवस्था खाली गेली. तरीही भारताची अर्थव्यवस्था मोदींच्या नेतृत्वात वर कशी येतेय, याचं दु:ख त्यांच्या वक्तव्यातून दिसत आहे, असा जोरदार टोला फडणवीस यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना लगावला आहे.

Budget 2022 – अर्थसंकल्पीय अधिवेशन

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरु झालं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशन हे दोन भागात असणार आहे. पहिला भाग हा 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारीपर्यंत आहे. तर दुसरा भाग 14 मार्च ते 8 एप्रिल दरम्यान असणार आहे.

Budget 2022 – तारीख आणि वेळ

अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सकाळी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प मांडणार आहेत. 2020मध्ये सीतारामन यांनी सर्वात लांब अर्थसंकल्पीय भाषण होतं. अर्थसंकल्प सीतारामन यांनी जवळपास 160 मिनिटं भाषण दिलं होतं. यंदा अर्थसंकल्पीय भाषण अंदाजित 1.30 तास ते 2 तासांदरम्यान असू शकते.

कुठे पाहता येईल अर्थसंकल्प?

यंदाही हे अर्थसंकल्प लोकसभा टीव्हीवर थेट दाखविण्यात येणार आहे. तसंच या अर्थसंकल्पनेचं थेट प्रक्षेपण तुम्ही टीव्ही9 मराठी या चॅनेलवर आणि टीव्ही9 मराठीच्या वेबसाईटवर पाहू शकता. तसंच इतर विविध न्यूज आउटलेट, YouTube आणि Twitter या सोशल मीडियावरही तुम्ही पाहू शकतात.

इतर बातम्या :

अर्थसंकल्पाचा शेअर मार्केटवर सकारात्मक परिणाम; सेन्सेक्स वधारला, निफ्टीमध्ये देखील वाढ

Budget 2022: अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सादर करतील इकोनॉमिक सर्वे, GDP अनुमानावर लागल्या आहेत सर्वांच्या नजरा

Budget 2022: निवडणुका येतील जातील, अधिवेशनात चांगल्या हेतूने चर्चा करा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.