बैलगाडा शर्यतीवरुन राजकारण तापलं, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांची मोठी घोषणा
बैलगाडा शर्यती दरम्यान जिथे गुन्हे दाखल झाले असतील ते गुन्हे मागे घेऊ आणि लोकांची यातून मुक्तता करण्याचा प्रयत्न करु, असं मोठं वक्तव्य दिलीप वळसे पाटील यांनी केलंय. गृहमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे गुन्हा दाखल झालेल्या शेतकऱ्यांना आणि बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, असं असलं तरी वळसे-पाटील यांनी शेतकऱ्यांना अजून एक आवाहन केलं आहे. पुढे खटले दाखल होणार नाही म्हणून बैलगाडा शर्यत भरवू नका, असं वळसे पाटील म्हणाले.
पुणे : गेल्या काही दिवसांत बैलगाडा शर्यतीवरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. बैलगाडा शर्यतीवर सर्वोच्च न्यायालयानं बंदी घातली आहे. मात्र, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांनी बैलगाडा शर्यत सुरु केल्या आहेत. त्या धर्तीवर महाराष्ट्रातही बैलगाडा शर्यत सुरु करावी अशी आक्रमक मागणी विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून होत आहे. गेल्या काही दिवसात राज्यातील विविध भागात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही पोलिसांना गुंगारा देत गनिमी काव्यानं सांगलीच्या झरे गावात बैलगाडा शर्यत करुन दाखवली. या प्रकरणात अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांबाबत आता गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. (Dilip Walse-Patil’s announcement to withdraw the cases filed from the bullock cart race)
बैलगाडा शर्यती दरम्यान जिथे गुन्हे दाखल झाले असतील ते गुन्हे मागे घेऊ आणि लोकांची यातून मुक्तता करण्याचा प्रयत्न करु, असं मोठं वक्तव्य दिलीप वळसे पाटील यांनी केलंय. गृहमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे गुन्हा दाखल झालेल्या शेतकऱ्यांना आणि बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, असं असलं तरी वळसे-पाटील यांनी शेतकऱ्यांना अजून एक आवाहन केलं आहे. पुढे खटले दाखल होणार नाही म्हणून बैलगाडा शर्यत भरवू नका, असं वळसे पाटील म्हणाले. ते आज आंबेगाव तालुक्यातील मंचर उपजिल्हा रुग्णालयातील नव्या सुविधांच्या लोकार्पणावेळी बोलत होते.
आढळराव पाटलांचा अल्टिमेटम
महत्वाची बाब म्हणजे एकीकडी वळसे-पाटील यांनी बैलगाडा शर्यत न भरवण्याचं आवाहन केलं असताना, दुसरीकडे शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गृहमंत्र्यांच्याच जिल्ह्यात बैलगाडा शर्यत होणार असं आव्हान दिलं आहे. आढळराव-पाटील यांनी त्यासाठी राज्य सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. महत्वाची बाब म्हणजे आढळराव पाटील यांनी गृहमंत्री उपस्थित असलेल्या व्यासपीठावरुनही हे आव्हान दिलं आहे.
पडळकरांनी स्पर्धा भरवली, आता गुन्हा दाखल
बैलगाडा शर्यतीला परवानगी द्यावी या मागणीला घेऊन भाजप आमदार गोपीचंद पडळकर काही दिवसांपासून आक्रमक झाले आहेत. त्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी सांगली जिल्ह्यातील झरे गावात भव्य अशी बैलगाडा शर्यत आयोजित केली होती. काहीही झाले तरी शर्यत घेणारच असा निश्चय पडळकर यांनी केला होता. नंतर पडळकर समर्थकांनी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास एका मैदानात धावपट्टी तयार केली आणि पुढच्या काही तासांत तिथे स्पर्धा भरवली. या प्रकारानंतर आता सांगलीतील प्रशासनाने कायदेशीर कारवाई केली आहे. पडळकर यांच्यावर जिल्हाधिकारी तसेच सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धुडकावल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. पडळकर तसेच इतर 41 जणांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर बातम्या :
स्टंटबाजी कशाला करताय, आमचीही तीच भूमिका, पडळकरांच्या बैलगाडा शर्यतीनंतर अजित पवारांचं मोठं भाष्य
गोपीचंद पडळकरांच्या बैलगाडा शर्यतीत ‘सागर-सुंदर’ 1 नंबर, बक्षीसाची रक्कम किती?
Dilip Walse-Patil’s announcement to withdraw the cases filed from the bullock cart race