बैलगाडा शर्यतीबाबत कायद्याच्या चाकोरीतून निर्णय घ्यावा लागेल, जयंत पाटलांचा इशारा; गोपीचंद पडळकर मात्र ठाम
बैलगाडा शर्यतीबाबत कायद्याच्या चाकोरीतून निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिलाय. बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्पष्ट आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्बंध आहेत, तोवर ती सर्वांनाच लागू असतील. त्यामुळे कुठे बैलगाडा शर्यत होत असतील तर त्यावर कायद्याच्या चाकोरीत बसून निर्णय घ्यावा लागेल, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय.
सांगली : बैलगाडा शर्यतीवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. कारण, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीच्या झरे गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे. तर दुसरीकडे बैलगाडा शर्यतीबाबत कायद्याच्या चाकोरीतून निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिलाय. बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्पष्ट आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्बंध आहेत, तोवर ती सर्वांनाच लागू असतील. त्यामुळे कुठे बैलगाडा शर्यत होत असतील तर त्यावर कायद्याच्या चाकोरीत बसून निर्णय घ्यावा लागेल, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. (Gopichand Padalkar organizes bullock cart race, Jayant Patil’s warning to Padalkar)
आमदार गोपीचंद पडळकर यांनी बंदी असलेल्या बैलगाडा शर्यत घेण्याचं जाहीर केलं आहे. त्यासाठी त्यांनी बक्षिसही जाहीर केलं आहे. सांगली जिल्ह्यातील झरे गावात 20 ऑगस्ट रोजी ही शर्यत घेणार असल्याचं पडळकर यांनी जाहीर केलं आहे. या शर्यती बाबतीत जिल्हा प्रशासन काय निर्णय घेणार, असं विचारलं असता जयंत पाटील यांनी इशारा दिलाय. त्याचबरोबर बैलगाडा शर्यती सुरू कराव्यात ही लोकांची मागणी आहे, असं वक्तव्यही जयंत पाटील यांनी केलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला
काही लोक काहीतरी बोलून लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधण्याचं काम करत असतात. अशा लोकांकडे समाजच दुर्लक्ष करेल अशी माझी खात्री आहे, अशा शब्दात जयंत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव न घेता टोला लगावला आहे. कारण, राष्ट्रवादी स्थापन झाल्यापासून राज्यात जातीवाद वाढल्याचं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं.
सर्जा-राजा, शेतीमातीसाठी बैलगाडा शर्यत- गोपीचंद पडळकर
शेतकऱ्यांनो आता आपल्यालाच आपल्या सर्जा-राजा आणि शेतीमातीसाठी एकत्र यावं लागणार आहे, असे आव्हान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय. पडळकर यांनी सरकारच्या विरोधात बैलगाडा-छकडा शर्यतीचं आयोजन केलं आहे. 20 ॲागस्ट रोजी सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील झरे गावात ही शर्यत आयोजित करण्यात आली आहे. त्याची पाहणी आज पडळकर यांनी झरे गावात केली. गोवंशाच्या आस्तित्वासाठी आणि शेतकऱ्यांच्या आस्मितेसाठी आपल्याला लढा द्यायचा आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा असे आव्हान पडळकर यांनी केलं आहे.
प्रथम येणाऱ्यास 1 लाख 11 हजार रुपयांचं बक्षीस
महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यास कायद्यानुसार बंदी आहे. ही बंदी उठवण्याची मागणी राज्यातील काही संघटना तसेच पक्षांनी केली आहे. या मुद्द्याला घेऊन अनेक ठिकाणी आंदोलनदेखील करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बैलडागा शर्यतीसाठी पडळकरसुद्धा मैदानात उतरले आहेत. त्यांनी सांगली जिल्ह्यातील झरे या गावात भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. या शर्यतीत प्रथम येणाऱ्यास त्यांनी 1 लाख 11 हजार रुपयांचं बक्षीस देणार असल्याचं जाहीर केलंय. द्वितीय तसेच तृतीय आणि चौथा क्रमांक पटकावणाऱ्यांनाही वेगवेगळे बक्षीस देण्यात येणार आहे.
इतर बातम्या :
‘तुम्ही नारळ फोडत राहा, उमेदवारी मला मिळो’, विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटलांमध्ये मिश्कील टोलेबाजी
Gopichand Padalkar organizes bullock cart race, Jayant Patil’s warning to Padalkar