वसई विरारचे बहुजन विकास आघाडीचे 3 नगरसेवक तर तलासरीच्या राष्ट्रवादीच्या तालुकाअध्यक्षांच्या हाती शिवबंधन
वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला शिवसेनेनं मोठा दणका दिला आहे. बहुजन विकास आघाडीचे तीन नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव टाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
वसई : वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला शिवसेनेनं मोठा दणका दिला आहे. बहुजन विकास आघाडीचे तीन नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार रविंद्र फाटक यांच्या उपस्थित हा पक्ष प्रवेश झालाय. या पक्षप्रवेशामुळं वसई विरारमध्ये शिवेसनेची ताकद वाढली आहे.
महानगरपालिकेच्या नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
बहुजन विकास आघाडी च्या नगरसेवक सुरेश चौधरी , नगरसेवक किशोर पाटील आणि नगरसेविका पुतूल झा आणि अकरा प्रमुख पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय. संपर्कप्रमुख आमदार रविंद्र फाटक यांनी या पक्ष प्रवेशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक व पदाधिकारी यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
शिवसेनेला बळकटी मिळेल
पालघरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण या पक्ष प्रवेशामुळं जिल्ह्यात पक्षाला बळकटी मिळेल असं म्हटलं आहे. आज वसई विरार महापालिका क्षेत्रातील 14 जणांनी पक्षात प्रवेश केलाय. शिवसेना पालघर जिल्ह्यात क्रमांक एकचा पक्ष आहे, त्याला आणखी बळकटी मिळेल, असं वसंत चव्हाण म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवसेनेत
तलासरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्षांसहित संपूर्ण तालुका कार्यकारणीचा मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेने मध्ये जाहीर प्रवेश झाला.यावेळी संपर्क प्रमुख आमदार रविंद्र फाटक हे उपस्थित होते.
आजचे प्रवेश प्रातिनिधिक
वसंत चव्हाण यांनी आजचे पक्ष प्रवेश हे प्रातिनिधीक स्वरुपाचे आहेत. यापुढेही मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश होतील, असं म्हटलंय. आजचा प्रातिनिधिक प्रवेश होता अजून प्रवेश होणार आहेत, असंही ते म्हणाले.
इतर बातम्या:
मालेगावात समाजवादी पक्षाला तर बुलडाण्यात भाजपला धक्का, काँग्रेस राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचे सोहळे!
BVA and NCP party workers in Vasai Virar and Palghar join Shivsena in the presence of Uddhav Thackeray