राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीच्या दोन, तर काँग्रेसच्या एका नेत्याला स्थान?

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तशा चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. पुढल्या महिन्यात 5 ते 10 जून दरम्यान राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या संदर्भातील सर्व निर्णय […]

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीच्या दोन, तर काँग्रेसच्या एका नेत्याला स्थान?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तशा चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. पुढल्या महिन्यात 5 ते 10 जून दरम्यान राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या संदर्भातील सर्व निर्णय लोकसभा निवडणुकीच्या 23 मेच्या निकालावर अवलंबून आहे.

राष्ट्रवादीच्या दोन, तर काँग्रेसच्या एका नेत्याला स्थान?

विशेष म्हणजे, राधाकृष्ण विखे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांनाही राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान मिळणार आहे, अशीही शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील आणि राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर यांनाही राज्य मंत्रिमंडळात समावेश करुन घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, या तिघाही नेत्यांनी त्यांच्या आताच्या पक्षांचे राजीनामे दिले नाहीत. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेल्या या नेत्यांना भाजप गळाला लावण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर शिवसेना सत्तेत सहभागी झाली आणि त्यानंतर विस्तार झाला होता. मात्र, त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशा फक्त चर्चा झाल्या. मात्र, प्रत्यक्षात मंत्रिमंडळाचा विस्तार झालाच नाही. अखेर लोकसभा निवडणुकीनंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.