Nitesh Rane : ‘बंदोबस्त करणार’, मंत्रिपदाचा पदभार स्वीकारताच नितेश राणेंनी कोणाला दिला इशारा?

Nitesh Rane : आमदार नितेश राणे हे भाजपचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. हिंदुत्वाच्या मुद्यावर त्यांची भूमिका अत्यंत आक्रमक असते. आज त्यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारताना बंदोबस्त करण्याचा इशारा दिला आहे. तिसऱ्यांदा ते कणकवलीतून विधानसभेची निवडणूक जिंकले आहेत.

Nitesh Rane :  'बंदोबस्त करणार', मंत्रिपदाचा पदभार स्वीकारताच नितेश राणेंनी कोणाला दिला इशारा?
Minister Nitesh Rane
Follow us
| Updated on: Dec 24, 2024 | 1:50 PM

कणकवली विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजयाची हॅट्ट्रिक करणारे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये नितेश राणे यांना मोठी जबाबदारी मिळाली आहे. नितेश राणे पहिल्यांदाच मत्स्य आणि बंदर खात्याचे मंत्री झाले आहेत. आमदार म्हणून दमदार कामगिरी केली, म्हणून कणकवलीच्या जनतेने तिसऱ्यांदा त्यांना भरघोर मताधिक्क्याने निवडून दिलं. महत्त्वाच म्हणजे प्रत्येक निवडणुकीत नितेश राणे यांचं मताधिक्क्य वाढत गेलय. आता ते राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत.

आज त्यांनी मत्स्य आणि बंदर खात्याचा पदभार स्वीकारला. नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर मीडियाशी बोलताना म्हणाले की, “दोन्ही खात्यांमध्ये काय सुरु आहे? आपण कुठून सुरुवात करायची? याचा मी आढावा घेतला आहे” “माझ्या काही अपेक्षा किंवा विकासाच्या अनुषंगाने बदल करण्यासाठी काय करता येईल, यासाठी काही सूचना देण्यात आल्या आहेत” असं नितेश राणे म्हणाले.

कोणाचा बंदोबस्त करण्याचा इशारा ?

“सागरी सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे. 26/11 नंतर आपण बरीच खबरदारी घेतली. मात्र आताही काही जिहादी लोकांच्या एक्टिव्हिटी सागरी किनाऱ्यावर काम करत असतात. त्यासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न करणार” असं नितेश राणे म्हणाले. “रोहींग्यो आणि बांगलादेशी यांचं वास्तव्य सहन करणार नाही, त्यांना सोडणार नाही. त्यांची सफाई मोहीम हाती घेऊ. समुद्री किनाऱ्यावर वसणाऱ्या बांगलादेशींचीही बंदोबस्त करणार” असा नितेश राणे यांनी इशारा दिला.

आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा

आमदार नितेश राणे हे राज्यभरात भाजपचा आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा म्हणून ओळखले जातात. नेहमी हिंदुंच्या मुद्यावरुन त्यांची आक्रमक भूमिका असते. आज मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तीच बाब दिसून आली. कारण रोहींग्यो आणि बांगलादेशी यांचं वास्तव्य सहन करणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.