tv9 Marathi Special : पैगंबरांवरील वादग्रस्त विधानावरून अरब राष्ट्र नाराज, आंतराराष्ट्रीय संबंधावर परिणाम होणार?

tv9 Marathi Special : एकीकडे रशिया आणि युक्रेन दरम्यान युद्ध सुरू आहे. त्यामुळे जग दोन भागात विभागलं गेलं आहे. अशावेळी ऊर्जा संकटावर मात करण्यासाठी अमेरिकेची नाराजी ओढवून भारत रशियाकडून स्वस्तातील तेल खरेदी करत आहे.

tv9 Marathi Special : पैगंबरांवरील वादग्रस्त विधानावरून अरब राष्ट्र नाराज, आंतराराष्ट्रीय संबंधावर परिणाम होणार?
पैगंबरांवरील वादग्रस्त विधानावरून अरब राष्ट्र नाराज, आंतराराष्ट्रीय संबंधावर परिणाम होणार?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 8:00 PM

नवी दिल्ली: भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा (BJP Spokesperson Nupur Sharma) आणि मीडिया प्रभारी नवीन जिंदल यांच्यावर भाजपने मोठी कारवाई केली आहे. मोहम्मद पैगंबारांबाबत अनुद्गार काढल्याबद्दल नुपूर शर्मा यांची प्राथमिक सदस्यता काढून घेण्यात आली आहे. तर नवीन जिंदल (BJP Leader Naveen Jindal) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या दोन्ही नेत्यांनी पैगंबरांविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर भाजपमध्ये (BJP) एकच खळबळ उडाली आहे. स्वत: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एक पत्रक काढून खुलासाही केला आहे. भाजप सर्वच धर्मांचा सन्मान करते. कोणत्याही धर्मातील पूज्यनीय व्यक्तींचा अपमान सहन केला जाणार नाही, असं भाजपचे महासचिव अरुण सिंह यांनी म्हटलं आहे. मात्र हा वाद केवळ एका पक्षापुरता किंवा भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही. या मुद्द्यावरून अरब राष्ट्रांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर भारताला स्पष्टीकरण द्याव लागलं आहे.

भारत आणि अरब राष्ट्रांमध्ये सर्वाधिक व्यापार तेल आयातीचा होतो. रशियाप्रमाणेच भारत अरब राष्ट्रांवरही तेलाच्या बाबतीत निर्भर आहे. त्यामुळे भारताने नेहमीच अरब राष्ट्राशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले आहेत. परंतु, भाजपच्या प्रवक्त्यांनी थेट अरब राष्ट्रांच्या आस्थेलाच हात घातल्याने हे देश नाराज झाले आहेत. त्यामुळे त्याचा तेलाच्या व्यापारावर परिणाम होऊ शकत असल्याने भाजपने वादग्रस्त विधान करणाऱ्या नेत्यांवर तडकाफडकी कारवाई केली आहे. अरब राष्ट्रे दुखावले जाऊ नयेत म्हणून भाजपने तातडीने ही कारवाई केली आहे.

हे सुद्धा वाचा

हे देश नाराज

>> कतार >> तेहरान >> इराण >> कुवैत

अमेरिकेची नाराजी ओढवून रशियाकडून तेल खरेदी

एकीकडे रशिया आणि युक्रेन दरम्यान युद्ध सुरू आहे. त्यामुळे जग दोन भागात विभागलं गेलं आहे. अशावेळी ऊर्जा संकटावर मात करण्यासाठी अमेरिकेची नाराजी ओढवून भारत रशियाकडून स्वस्तातील तेल खरेदी करत आहे. त्यामुळे भारताला अरब राष्ट्रांची नाराजी महागात पडणार का? याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे. भारताची लोकसंख्या सव्वा अब्जहून अधिक आहे. या लोकसंख्येत दरवर्षी वाढ होत आहे. त्यामुळे भारताच्या ऊर्जा क्षेत्राची मागणीही वाढू लागली आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी भारताची सर्व मदार अरब राष्ट्रांवर आहे. भारत सध्या तरी रशियाकडून स्वस्तातील ऊर्जा खरेदी केली जात असली तरी उद्या जर रशियाने निर्बंध अधिक कडक केल्यास भारताला अरब राष्ट्रांवरच सर्वस्वी अवलंबून राहावं लागणार आहे. त्यामुळेच अरब राष्ट्रांना नाराज करण्याच्या मनस्थितीत भारत नाहीये.

अब्जो रुपयांची मिळकत

अरब देशात भारतीय मजदूर मोठ्या प्रमाणावर काम करतात. हे मजूर आपल्या कमाईचा मोठा हिस्सा भारतात पाठवतात. अरब राष्ट्रातून येणाऱ्या रेमिटेन्समुळे भारताची विदेशी मुद्रा भंडार वाढण्यास मदत होत आहे. वर्ल्ड बँकेने 2021च्या जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतात सर्वाधिक रेमिटेन्स येतात. त्यामुळे भारताला अरब देशांची नाराजी ओढवून चालणार नाही. गल्फ न्यूज रिपोर्टनुसार 2021च्या दुसऱ्या चौमाहीत संयुक्त अरब अमिरातीतून येणाऱ्या या पैशात वर्षाला 8.7 टक्के किंवा 3.6 टक्के अब्ज दिरहमची वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. या काळात भारताला सर्वाधिक 28.8 टक्के रेमिटेन्स पाठवण्यात आले आहेत.

तेल आयातीत भारत तिसरा

तेलाची आयात करणारा भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा देश आहे. तसेच भारत एक चतुर्थांश एलएनजीची आयात करतो. चालू आर्थिक वर्षात भारताने तेल आयातीत 100 बिलियन डॉलरचा आकडा कधीच पार केला आहे. भारताने गेल्या दहा महिन्यांपूर्वीच 94.3 बिलियन डॉलरचा आकडा पार केला आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षाच्या अखेरीस भारत 105 ते 110 बिलियन डॉलरचे आकडे पार करू शकतो. भारत आपल्या आवश्यकतेच्या जवळपास 84 टक्के क्रूड ऑईल आयात करतो.

तेलाची आयात कुठून होते?

>> मिडल ईस्ट – 52.7 टक्के >> अफ्रिका – 15 टक्के >> यूनायटेड अफ्रिका – 14 टक्के

या देशातून तेलाची सर्वाधिक आयात

>> इराक >> यूनायटेड स्टेट >> नाइजेरिया >> सौदी अरब >> यूएई

मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.