पुण्यातील दोन मतदार संघात एकाच नावाचे दोन उमेदवार, मतदारांचा गोंधळ वाढणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांना या ठिकाणी पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. त्यांचे नाम साधर्म्य असलेल्या एका अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार महेश शिंदे आणि शशिकांत शिंदे यांच्यात लढत होत आहे.

पुण्यातील दोन मतदार संघात एकाच नावाचे दोन उमेदवार, मतदारांचा गोंधळ वाढणार?
विधानभवनImage Credit source: Internet
Follow us
| Updated on: Oct 31, 2024 | 11:07 AM

विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय डावपेच लढवले जात आहे. विरोधी उमेदवार पाडण्यासाठी अनेक पर्याय शोधले जातात. त्याचा नावाचा उमेदवार शोधून त्याला अर्ज भरायला लावले जाते. मग शेक्सपियरने म्हटले होते नावात काय आहे? परंतु त्यातून लाभ घेण्याचा प्रयत्न केला जातो. विधानसभा निवडणूक आणि त्यातील राजकीय डावपेच पाहिले तर नावात बरंच काही असल्याचे कळेल. मतदारांची दिशाभूल करण्यासाठी प्रतिस्पर्धीबद्दल संभ्रम निर्माण करण्यासाठी उमेदवाराच्या नाव आडनावाशी साध्यर्म असलेल्या व्यक्तींना निवडणूक रिंगणात उतरविले गेले आहे. पुणे शहरातील वडगाव शेरी विधानसभा आणि पर्वतीत एकाच ठिकाणी दोन नावाचे उमेदवार दिले गेले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस समोर अडचण निर्माण झाली आहे.

हे दोन उमेदवार नावात साधर्म्य

पर्वतीमध्ये महायुतीकडून भाजपच्या माधुरी मिसाळ निवडणूक रिंगणात आहे. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अश्विनी नितीन कदम यांना उमदेवारी दिली आहे. अश्विनी नितीन कदम या सिंहगड रस्त्यावर राहतात. जनता वसाहत येथील अश्विनी अनिल कदम यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीकडून बापूसाहेब पठारे उमेदवार आहेत. याच मतदार संघातून श्रीगोंदा येथील बापूसाहेब पठारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातच नाही तर राज्यातील इतर मतदार संघामध्ये असा प्रकार आहे. कुडाळ-मालवण मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान आमदार वैभव नाईक यांच्याशी नाम साधर्म्य असलेले दुसरे वैभव नाईक रिंगणात उतरलेत. नावातील या साधर्म्याचा फटका उमेदवारांनी किती बसणार हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल. परंतु अटीतटीच्या लढतीत प्रतिस्पर्धी उमेदवारास पराभूत करण्यासाठी ही चाल योग्य ठरत आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघात राजकीय विरोधकांनी हा प्रकार केला आहे.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांना या ठिकाणी पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. त्यांचे नाम साधर्म्य असलेल्या एका अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार महेश शिंदे आणि शशिकांत शिंदे यांच्यात लढत होत आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.