कॅप्टन अमरिंदर सिंह पुन्हा दिल्लीवारी करणार, पंतप्रधान मोदींच्या भेटीची शक्यता, वाचा कुठल्या मुद्द्यांवर चर्चेची होणार?

या भेटीत 3 कृषी कायदे आणि पंजाबमधील सीमा परिस्थितीबाबत ते पंतप्रधानांशी चर्चा करणार आहे. याआधीही कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत पत्र लिहिलं होतं.

कॅप्टन अमरिंदर सिंह पुन्हा दिल्लीवारी करणार, पंतप्रधान मोदींच्या भेटीची शक्यता, वाचा कुठल्या मुद्द्यांवर चर्चेची होणार?
कॅप्टन अमरिंदर सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट ( फाईल फोटो )
Follow us
| Updated on: Oct 06, 2021 | 1:00 PM

नवी दिल्ली: पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आज दिल्लीला रवाना होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅप्टनला दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे. या भेटीत 3 कृषी कायदे आणि पंजाबमधील सीमा परिस्थितीबाबत ते पंतप्रधानांशी चर्चा करणार आहे. याआधीही कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत पत्र लिहिलं होतं. ( Captain Amarinder Singh Delhi visit to meet PM Narendra Modi on farmers and Punjab issues )

अमरिंदर सिंह यांच्याकडून मोदींना पत्र

पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंतप्रधान मोदींना आधीही पत्र लिहिले होतं. ज्यामध्ये त्यांनी पंजाबच्या सीमेवरील सुरक्षा आणि सीमेपलीकडून वाढत्या दहशतवादी धोक्यांकडे लक्ष देण्याची मागणी केली होती. यासोबतच त्यांनी कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांशी बोलण्याचा आग्रहही केला होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवण्याबाबतही कॅप्टन बोलले होते.

पंजाब विधानसभा निवडणुकीआधी चर्चा

पुढच्या वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, हेच पाहता कॅप्टन अमरिंदर सिंग आणि पंतप्रधान यांच्यात ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अमरिंदर सिंह हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बाहेरून पाठिंबा देऊ शकतात, अशी राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनावरही चर्चेची शक्यता

हेच नाही तर, कृषी कायद्याबाबत जे पंजाबचे शेतकरी आंदोलन करत आहेत, ते आंदोलन पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी संपवण्यात अमरिंदर सिंह महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, अशी भाजपला आशा आहे. कारण हे आंदोलन असंच सुरु राहिलं तर भाजपला पंजाबमध्ये त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, पंजाब काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत वादाला कंटाळून माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी राजीनामा दिला होता. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांच्यासोबत त्याचे वाद याचं मुख्य कारण सांगितलं जातं. त्यानंतर काँग्रेसने अमरिंदर सिंह यांच्याजागी चरणजीत सिंह चन्नी यांना पंजाबचा नवा मुख्यमंत्री बनवलं.

कॅप्टन अमरिंदर सिंह काँग्रेसमध्ये निराश

आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर, कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सोशल मीडियावर आपला म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले होते की, राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा त्यांच्या मुलांप्रमाणे आहेत, मात्र पंजाबसाठी त्यांचं जे धोरण राहिलं आहेत, त्यातून त्यांच्यात अनुभवाची कमी साफ दिसते. हेच नाही तर त्यांनी पक्षात आपल्याला अमानित झाल्यासारखं वाटतं असंही ते म्हणाले होते. त्याच्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा:

मारा, गाडा काहीही करा, पण शेतकऱ्यांचा मुद्दा लावून धरणारच; लखीमपूरला जाण्यावर राहुल गांधी ठाम

लोकशाहीसंदर्भात जो आवाज उठवतो, त्याची नाकेबंदी केली जातेय, संजय राऊत कडाडले

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.