“सिद्धूला लहानपणापासून ओळखतो, मला हटवून त्याला मुख्यमंत्री बनायचंय”

पटियाला : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांच्यावर जोरदार टीका केली. त्यामुळे पंजाब काँग्रेसमधील वाद ऐन मतदानाच्या दिवशी चव्हाट्यावर आलेत. सिद्धू सातत्याने पंजाबमधील काँग्रेस नेतृत्त्व आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यावर टीका करत आहेत. याची दखल अमरिंदर सिंह यांनी घेतली आणि सिद्धू यांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिले. “नवज्योत सिंह सिद्धू […]

“सिद्धूला लहानपणापासून ओळखतो, मला हटवून त्याला मुख्यमंत्री बनायचंय”
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:36 PM

पटियाला : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांच्यावर जोरदार टीका केली. त्यामुळे पंजाब काँग्रेसमधील वाद ऐन मतदानाच्या दिवशी चव्हाट्यावर आलेत. सिद्धू सातत्याने पंजाबमधील काँग्रेस नेतृत्त्व आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यावर टीका करत आहेत. याची दखल अमरिंदर सिंह यांनी घेतली आणि सिद्धू यांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिले.

“नवज्योत सिंह सिद्धू खरे काँग्रेसी असतील, तर त्यांनी काहीही बोलण्यासाठी योग्य अशी वेळ ठरवावी लागेल. पंजाबमध्ये मतदान पार पडत असताना, त्यांनी अशी विधाने करायला नको.” असे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले. पटियाला येथे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी माध्यमांशी संवाद साधला.

“नवज्योत सिंह सिद्धू यांच्यासोबत कुठलाही वाद नाही. ते महत्त्वाकांक्षी आहेत, तर तेही ठीक आहे. मी त्यांना लहानपणापासून ओळखतो. माझं त्यांच्याशी कुठलेही मतभेद नाहीत. ते मुख्यमंत्री बनू इच्छित आहेत आणि तेही मला बदलून. त्यांचं असेच काम राहिले आहे.” असे म्हणत कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी नवज्योत सिंह सिद्धू यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

अमरिंदर सिंह यांची पत्नी आणि माजी केंद्रीय मंत्री प्रिणित कौर यांना काँग्रेसने पटियाला लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं आहे. पटियालाच नव्हे, तर पंजाबमधील सर्व 13 जागांवर काँग्रेस क्लीन स्विप मारेल, असा विश्वास कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी व्यक्त केला.

काहीच दिवसांपूर्वी नवज्योत सिंह सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर यांनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आमि पंजाबच्या प्रभारी आशा कुमार यांच्यावर अमृतसरमधून आपल्याला तिकीट मिळाल्याचा आरोप केला. मात्र, अमरिंदर सिंह यांनीच पुढे येत स्पष्ट केले होते की, “नवज्योत सिंह कौर यांना पक्षाने अमृतसर आणि बठिंडा येथून निवडणूक लढण्यासाठी तिकीट देऊ केली होती. मात्र त्यांनीच नकार दिला.”

यानंतर पत्नी नवज्योत सिंह कौर हिच्या बचावासाठी पुढे सरसावलेल्या नवज्योतसिंह सिद्धू यांनी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यावर टीका केली आणि “माझी पत्नी कधीच खोटं बोलत नाही” असे म्हणत नवज्योत सिंह कौर यांची पाठराखण केली होती.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.