आरोपीच्या समर्थनार्थ मोर्चा काढणे भोवले, भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्यावर गुन्हा

आरोपी इरफान शेख याच्या समर्थनार्थ पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्यामुळे भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (MLA Devyani Farande protest)

आरोपीच्या समर्थनार्थ मोर्चा काढणे भोवले, भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्यावर गुन्हा
Follow us
| Updated on: Dec 23, 2020 | 7:15 PM

नाशिक : आरोपी इरफान शेख याच्या समर्थनार्थ पोलीस ठाण्यावर मोर्चा काढलेल्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते आणि मोर्चेकरी होते. त्यापैकी 200 जणांविरोधात इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याने पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. (case registered against BJP MLA Devyani Farande for protesting at a police station)

नेमका प्रकार काय ?

वडाळा परिसरात एक डॉकटर आणि स्थानिकांमध्ये वाद झाला होता. या वादात स्थानिक रहिवाशांपैकी एका जमावावर पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत आमदार फरांदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांवरोधात मोर्चा काढण्यात आला. मात्र, यावेळी जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन झाल्याने पोलिसांनी आमदार देवयानी फरांदे यांच्यासह मोर्चात सहभागी झालेल्या 200 जणांवर गुन्हा दाखल केला. आमदार फरांदे यांच्या नेतृत्वाखाली ज्या आरोपीच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता; तो तडीपार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याच कारणामुले कठोर पाऊल उचलल्याच बोललं जातंय.

याआधीही देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वात महिला अत्याचाराविरोधात 12 ऑक्टोबर रोजी मोर्चा काढण्यात आला होता. इंदिरानगर परिसारात हा मोर्चा आल्यानंतर या ठिकाणी गोंधळ उडाला होता. यावेळी जमावबंदीचे आदेश असल्याचे सांगत आंदोलनकर्त्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दरम्यान, देवयानी फरांदे आणि पोलीस अधिकारी यांच्यात वाद निर्माण झाला होता. या वादामुळे इंदिरानगर परिसरात गोंधळ निर्माण झाला होता.

त्यानंतर आता देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वात आरोपी इरफान शेख याच्या समर्थनार्थ इंदिरानगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यावर फरांदे कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

उद्धव ठाकरेंना 50 वर्ष मुख्यमंत्री राहण्यासाठी शुभेच्छा: देवेंद्र फडणवीस

शिवसेनेसोबत कायम राहायचंय, स्थानिक‌ पातळीवर जमवून घ्या, अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सूचना

…तर ती माझी राजकीय आत्महत्याच ठरली असती; अब्दुल सत्तारांचं गंभीर विधान

(case registered against BJP MLA Devyani Farande for protesting at a police station)

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.