CBI raid at Manish Sisodia : आजचा दिवस धाडीचा, 7 राज्यात 21 ठिकाणी सीबीआयचे छापे, दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांनाही दणका

CBI raid at Manish Sisodia : सीबीआयचे अधिकारी आले आहेत. त्यांचं स्वागत आहे. आम्ही कट्टर प्रामाणिक आहोत. लाखो मुलांचं भविष्य घडवत आहोत. जी व्यक्ती चांगलं काम करते, तिला त्रास दिला जातोय हे अत्यंत दुर्देव आहे. त्यामुळेच आपला देश नंबर वन होऊ शकला नाही, असं सिसोदिया म्हणाले.

CBI raid at Manish Sisodia : आजचा दिवस धाडीचा, 7 राज्यात 21 ठिकाणी सीबीआयचे छापे, दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांनाही दणका
आजचा दिवस धाडीचा, 7 राज्यात 21 ठिकाणी सीबीआयचे छापे, दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांनाही दणकाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 3:55 PM

नवी दिल्ली: देशभरात जल्लोषात दहीहंडी साजरी केली जात असतानाच सीबीआयने (CBI raid) मात्र, अनेक ठिकाणी आज छापेमारी करत अनेकांची झोप उडवली आहे. सीबीआयने सात राज्यात 21 ठिकाणी छापेमारी केली आहे. गेल्या पाच तासांपासून या ठिकाणी सीबीआयची छापेमारी सुरू आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या निवासस्थानीही सीबीआयने छापे मारले आहेत. दिल्लीतील एक्साईज पॉलिसीमधील (excise policy case) अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर ही छापेमारी करण्यात आली आहे. निवृत्त एक्साईज कमिश्नर अरावा गोपी कृष्णना यांच्या निवासस्थानीही पोलिसांनी छापेमारी केली असून तब्बल पाच तासांपासून झाडाझडती सुरू आहे. थेट उपमुख्यमंत्र्यांच्याच घरी सीबीआयने छापे मारल्याने आम आदमी पार्टीत खळबळ उडाली आहे. आपकडून या छापेमारीचा निषेध नोंदविण्यात आला आहे. तर सीबीआयला संपूर्ण सहकार्य करत असल्याचं सिसोदिया यांनी म्हटलं आहे.

दिल्ली सरकारच्या एक्साईज पॉलिसीच्या अनुषंगाने सीबीआयने ही छापेमारी सुरू केली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांच्या अहवालात या पॉलिसीवरून सिसोदिया यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. दिल्लीचे उपराज्यपाल विनय सक्सेना यांनी सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. त्यानंतर सीबीआयने आज सकाळीच सिसोदिया यांचं घर आणि कार्यालयावर छापेमारी केली आहे. अचानक झालेल्या या छापेमारीमुळे आम आदमी पार्टीत एकच खळबळ उडाली आहे. तसेच दिल्लीसह एकूण सात राज्यात 21 ठिकाणी छापेमारी सुरू आहे. या छापेमारीतून सीबीआयच्या हाती काय लागतं हे संध्याकाळपर्यंत समजण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे सुद्धा वाचा

चार अधिकारी सीबीआयच्या रडारवर

सीबीआयने निवृत्त एक्साईज कमिश्नर गोपी कृष्णना यांच्यासह तीन अधिकाऱ्यांच्या घरावर छापेमारी केली आहे. गोपी कृष्णना हे माजी एक्साईज कमिश्नर आहेत. त्यांनीच हे वादग्रस्त धोरण तयार केलं होतं आणि लागूही केलं होतं. विशेष म्हणजे दिल्लीच्या उपराज्यपालांनी ज्या 11 अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश दिले आहेत, त्यापैकी हे चारही अधिकारी आहेत.

सिसोदिया म्हणाले, वेलकम

उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी ट्विट करून सीबीआयच्या धाडीची माहिती दिली. सीबीआयचे अधिकारी आले आहेत. त्यांचं स्वागत आहे. आम्ही कट्टर प्रामाणिक आहोत. लाखो मुलांचं भविष्य घडवत आहोत. जी व्यक्ती चांगलं काम करते, तिला त्रास दिला जातोय हे अत्यंत दुर्देव आहे. त्यामुळेच आपला देश नंबर वन होऊ शकला नाही, असं सिसोदिया म्हणाले.

त्यांना आमचं काम पाहावत नाही

आम्ही चौकशीला पूर्ण सहकार्य करू. सत्य लवकर बाहेर येईल. आतापर्यंत माझ्यावर अनेक खटले दाखल केले. पण त्यातून काहीच निघालेले नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. आम्ही दिल्लीत शिक्षण आणि आरोग्यावर चांगलं काम केलं. त्यामुळे हे लोक अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना अटक केली. शिक्षण मंत्र्यांनाही अटक केली आहे. आरोग्य आणि शिक्षणाबाबत सुरू असलेली चांगली कामे रोखली जावीत म्हणून हे सर्व सुरू आहे. दोघांवरही खोटे आरोप ठेवले गेले आहेत. कोर्टात सत्य बाहेर येईलच, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.