Shivsena : खरी शिवसेना कुणाची ? केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दिलेल्या मुदतीत पुरावे सादर करण्याचे आदेश

सध्या दोन्ही पक्षाकडून महाराष्ट्रात दौरे सुरु केले आहेत. आदित्य ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करीत आहेत. कट्टर शिवसैनिक आदित्य ठाकरेंचे स्वागत करीत आहेत.

Shivsena : खरी शिवसेना कुणाची ? केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दिलेल्या मुदतीत पुरावे सादर करण्याचे आदेश
Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 10:22 AM

मुंबई – महाराष्ट्रातल्या राजकारणात (Maharashtra Politics) मागच्या काही दिवसांपासून खरी शिवसेना (Shivsena) कोणाची असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण शिंदे गट खरी शिवसेना आमची असल्याचं म्हणतं आहे. त्याचबरोबर संजय राऊत, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि उद्धव ठाकरे खरी शिवसेना आमची असल्याचं म्हणतं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मोठा पेच निर्माण झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. हे प्रकरण सध्या केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत गेलं आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणुक आयोगाने दोन्ही गटांना आपली कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग याबाबत निर्णय घेणार असल्याचे म्हटले जात आहे. ऑगस्ट महिन्याच्या 8 तारखेपर्यंत दुपारी एकवाजेपर्यंत कागदपत्रे जमा करण्याची मुभा देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी एका गटाला घेऊन वेगळी भूमिका जाहीर केल्यापासून महाराष्ट्रातलं राजकारण पुर्णपणे बदललं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात नवं सरकार आलं आहे.

शिंदे गट आणि शिवसेनेकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागण्यात आली आहे

महाराष्ट्रात सध्या जे सरकार स्थापन झालं आहे ते बेकायदेशीर असल्याचं शिवसेनेकडून सर्वोच्छ न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या गोष्टीवरती न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्याचबरोबर शिंदे गट आणि शिवसेनेकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागण्यात आली आहे. याबाबत खरी शिवसेना कुणाची याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांकडे कागदपत्रे मागण्यात आली आहे. पुढच्या महिन्यात दिलेल्या तारखेच्या आगोदर कागदपत्रे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे कागदपत्रे सादर केल्यानंतर केंद्रीय निवडणुक आयोग त्यावर नेमकी काय भूमिका घेणार हे पाहावे लागेल.

हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करीत आहेत

सध्या दोन्ही पक्षाकडून महाराष्ट्रात दौरे सुरु केले आहेत. आदित्य ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करीत आहेत. कट्टर शिवसैनिक आदित्य ठाकरेंचे स्वागत करीत आहेत. त्याचबरोबर आदित्य ठाकरे लोकांची पहिली काम करा असं सांगत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात रोज नव्याने कार्यकर्ते प्रवेश करीत आहेत. त्यामुळे येत्या काळात दोन्ही गटात मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.