“दिल्लीतही सरकार बदलू शकतं”, सुप्रिया सुळेंचे केंद्र सरकारबद्दल मोठं वक्तव्य, म्हणाल्या “येत्या ऑक्टोबरमध्ये….”

| Updated on: Jul 19, 2024 | 12:55 PM

या दरम्यान कार्यकर्त्यांना संबोधित करताना सुप्रिया सुळे यांनी आरक्षण, सरकार, निवडणूक यांसह अनेक विषयांवर भाष्य केले.

दिल्लीतही सरकार बदलू शकतं, सुप्रिया सुळेंचे केंद्र सरकारबद्दल मोठं वक्तव्य, म्हणाल्या येत्या ऑक्टोबरमध्ये....
Follow us on

Supriya Sule Big Statement : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी तयारी सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकांसाठी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. आता बारामतीमधील एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी राजकारणाविषयी एक मोठे वक्तव्य केले आहे. दिल्लीतही सरकार बदलू शकतं, पण महाराष्ट्रातील सरकार आपल्याला बदलायचंच आहे, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

बारामतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 व्या जयंतीनिमित्त भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला शरद पवार उपस्थित होते. या दरम्यान कार्यकर्त्यांना संबोधित करताना सुप्रिया सुळे यांनी आरक्षण, सरकार, निवडणूक यांसह अनेक विषयांवर भाष्य केले.

“26 जानेवारीला महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करणारा चित्ररथ”

“ऑक्टोबरमध्ये महाविकासआघाडीचं सरकार आल्यानंतर 26 जानेवारीला दिल्लीत जो कार्यक्रम असतो, त्यात महाराष्ट्राच्या वतीने मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या संकल्पनेवर तुमची मदत घेऊन, आपण तिकडे चांगलं डिझाईन करुन त्यांचा मान सन्मान करु. येत्या 26 जानेवारीला महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करणारा चित्ररथ आपण करु”, असे सुप्रिया सुळे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“महाराष्ट्रातील सरकार आपल्याला बदलायचंच आहे”

“यापुढे त्यांनी दिल्लीतही सरकार बदलू शकतं, हेही होऊ शकतं. पण महाराष्ट्रातील सरकार आपल्याला बदलायचंच आहे. त्यामुळे २६ जानेवारीला तुम्ही दिलेल्या संकल्पनेच्या आधारावर डिझाईन करुन पाठवू”, असे वक्तव्यही सुप्रिया सुळेंनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता तुम्ही बघाल की काही दिवसात हीच नवीन पिढी पुढचा महाराष्ट्र पुढील 25 ते 50 वर्षांचा महाराष्ट्र सगळ्यांच्या हातात देऊन महाराष्ट्राची आण, बाण आणि स्वाभिमान आपण दिल्लीच्या तख्तापर्यंत नेणार आहोत, असेही सुप्रिया सुळे म्हणाले. दरम्यान सुप्रिया सुळेंचे हे वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आहे. यावर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत.