प्रीतम मुंडेंना डावलून मंत्रिपद दिल्याने नाराज, आता पंकजा मुंडेंच्या हस्ते मंत्री भागवत कराड यांचा सत्कार!
खासदार प्रीतम मुंडे (Dr Pritam Munde) यांना मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde), यांनी अखेर नवे केंद्रीय मंत्री डॅा भागवत कराड (Bhagwat Karad) यांचा सत्कार केला.
नवी दिल्ली : खासदार प्रीतम मुंडे (Dr Pritam Munde) यांना मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde), यांनी अखेर नवे केंद्रीय मंत्री डॅा भागवत कराड (Bhagwat Karad) यांचा सत्कार केला. प्रीतम मुंडेंना डावलून भागवत कराड यांना मंत्रिपद मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज होत्या. मात्र पंकजा मुंडे यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान, भागवत कराड यांचा सत्कार केल्याचा फोटो समोर आला आहे.
प्रीतम मुंडे यांना डावलून भागवत कराड यांना मंत्रिपद मिळाल्यानं पंकजा समर्थकांनी नाराजी व्यक्त केली होती. यावेळी पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी त्यांच्या वरळी इथल्या निवासस्थानी धाव घेतली होती. मुंबईत मुंडे समर्थकांचा छोटेखानी मेळावा झाला होता.
त्यावेळी मुंडे भगिनींची नाराजी दिसून आली होती. या काळात केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची भेट पंकजा मुंडेंनी वारंवार टाळल्याची चर्चा होती. मात्र कालच्या कार्यक्रमात पंकजा मुंडेंच्या हस्तेच भागवत कराड यांचा सत्कार करण्यात आला.
भागवत कराड यांना मंत्रिपद
गेल्या महिन्यात नरेंद्र मोदी कॅबिनेटचा विस्तार झाला. यावेळी महाराष्ट्रातून नारायण राणे, डॉ. भारती पवार, कपिल पाटील आणि भागवत कराड या चौघांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं. डॉ भागवत कराड यांना अर्थराज्य मंत्रिपदाचा भार देण्यात आला आहे.
भागवत कराड यांचं ट्विट
भागवत कराड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “आज (12 जुलै) पंकजा मुंडे दिल्लीमध्ये बैठकीसाठी आल्या. त्यांची भेट घेतली. मन मोकळे झाले. मुंडे साहेबांची आठवण आवर्जून झाली. मी मंत्री झालो, मुंडे साहेब माझे नेते होते आणि आज ताई आहेत. त्यांनीही साहेबांच्या प्रमाणे शुभेच्छा दिल्या.”
आज @Pankajamunde ताई दिल्ली मध्ये बैठकीसाठी आल्या त्यांची भेट घेतली…मन मोकळे झाले..मुंडे साहेबांची आठवण आवर्जून झाली..मी मंत्री झालो मुंडे साहेब माझे नेते होते आणि आज ताई आहेत..त्यांनीही साहेबांच्या प्रमाणे शुभेच्छा दिल्या..
— Dr Bhagwat Kishanrao Karad (@DrBhagwatKarad) July 12, 2021
संबंधित बातम्या
धोब्याच्या बायकोची डिलिव्हरी झाली, त्याने कपडेच दिले नाहीत, रावसाहेब दानवेंचं कॉमेडी भाषण